उद्योगपती संजय कपूरचं गेल्या महिन्यात लंडनमध्ये पोलो खेळत असताना मृत्यू झाला होता. त्याचा मृत्यू कसा झाला, यावरुन अनेक तर्क-वितर्क लावले जात होते. मात्र संजय कपूरचा मृत्यू नैसर्गिक कारणाने झाल्याचं समोर आलं आहे. ब्रिटीश (युके) वैद्यकीय अधिकाऱ्यांनी संजय कपूर यांची पत्नी प्रिया सचदेव कपूर यांना रविवारी लिहिलेल्या पत्रात ही माहिती दिली.
सरे कोरोनर ऑफिसने तपासाअंती दिलेल्या माहितीनुसार, संजय कपूर यांचा मृत्यू नैसर्गिक कारणामुळे झाला आहे. लेफ्ट व्हेट्रिकुलर हायपरट्रॉफी (एलव्हीएच) आणि इस्केमिक हृदय रोगातून संजय कपूरचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे. एलव्हीएच एक अशी स्थिती आहे, ज्यात हृदयाच्या डाव्या बाजूला व्हेट्रिकुलर स्नायूंची जाड भिंत तयार होते. ज्यामुळे रक्त प्रभावीपणे पंप करणं कठीण होतं. हृदयाला अतिरिक्त मेहनत करावी लागली किंवा उच्च रक्तदाबामुळे ही स्थिती निर्माण होते. तर इस्केमिक हृदय रोगात हृदयाच्या स्नायूंना पुरेसं रक्त आणि ऑक्सिजन मिळत नाही. सर्वसाधारणपणे धमन्या आकुंचित झाल्यामुळे ही परिस्थिती उद्भवू शकते. यामागे अनेक कारणं आहेत. मात्र सर्वसाधारणपणे एथेरॉस्क्लेरोसिस हा एक प्रमुख कारण आहे. यामध्ये कोलेस्ट्रेरॉल आणि अन्य पदार्थ धमन्यांवर भिंत तयार करतात.
नक्की वाचा - संजय कपूरची सावत्र मुलगी सफीराने आडनाव बदललं; वडिलांच्या 30 हजार कोटींच्या संतत्तीत तिला काय मिळणार?
राणी कपूर यांचा धक्कादायक दावा
कोरोनर ऑफिसकडून सांगितल्यानुसार, याच्या आधारावर कोरोनर्स अँड जस्टिस अॅक्ट 2009 च्या कलम 4 अंतर्गत तपास बंद करण्यात आला आहे. आता कोणत्याही तपासाची आवश्यकता नाही. प्रिया कपूर यांच्या जवळील सूत्राने एनडीटीव्हीला सांगितलं, यावरुन स्पष्ट होतंय की काहीही चुकीचं घडलं नव्हतं. त्यांनी सांगितलं की, हा रिपोर्ट संजय यांची आई राणी कपूरला काही दिवसांपूर्वी पाठविण्यात आला आहे. मात्र तरीही राणी कपूर यांनी संजय कपूर यांची हत्या आंतरराष्ट्रीय कटाचा भाग असल्याचा दावा केला आहे. गेल्या आठवड्यात राणी कपूर यांनी सरे पोलिसांनी एक पत्र लिहिलं होतं. यामध्ये राणी कपूर यांनी त्यांच्याकडे विश्वसनीय आणि चिंताजनक पुरावे आहेत. यावरुन संजयचा मृत्यू अपघाती किंवा नैसर्गिक नव्हता.
संजयचा मृत्यू आंतरराष्ट्रीय कटाचा भाग?
राणी कपूर यांनी बनावट, संशयास्पद मालमत्ता हस्तांतरण आणि कायदेशीर कागदपत्रे दर्शविणाऱ्या कागदपत्रांचा उल्लेख केला आहे. तसेच, त्यांनी प्रिया कपूरवर आर्थिक फायद्यासाठी कट रचल्याचा आरोप केला. राणी कपूरने लिहिलंय, संजयचा मृत्यू आंतरराष्ट्रीय कटाचा भाग असू शकतो, ज्यामध्ये यूके, भारत आणि कदाचित अमेरिकेतील लोक आणि काही संस्थांचा समावेश असू शकतो.