Sunjay Kapur Property Case : दिल्ली उच्च न्यायालयात सुरू असलेल्या संजय कपूर यांच्या वारसा हक्काच्या (Estate Dispute) प्रकरणाला एक मोठा आणि अनपेक्षित ट्विस्ट मिळाला आहे. संजय यांची तिसरी पत्नी प्रिया सचदेव कपूर यांनी सादर केलेले कथित मृत्युपत्र (Will) वादाच्या केंद्रस्थानी आहे. पण या प्रकरणातील एका महत्त्वाच्या साक्षीदार श्रद्धा सूरी मारवाह यांच्या विसंगत जबाबाने या मृत्युपत्राच्या वैधतेवर (legitimacy) गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
जबाब बदलल्याने संशय
श्रद्धा सूरी यांनी यापूर्वी न्यायालयात सांगितले होते की, हे मृत्युपत्र त्यांना प्रिया कपूर यांच्याकडून मिळाले होते. मात्र, आता त्यांनी आपला जबाब बदलून, त्यांना हे मृत्युपत्र 14 जून रोजी दिनेश अग्रवाल नावाच्या व्यक्तीकडून ईमेलद्वारे मिळाल्याचे सांगितले. विशेष म्हणजे, याच ईमेलमध्ये त्यांना मृत्युपत्राची कार्यकारी (Executor) म्हणून नियुक्त केले होते.
यावर अधिक संशय तेव्हा वाढला, जेव्हा अग्रवाल यांनी नंतर 'चुकीने' ट्रस्ट डीड (Trust Deed) जोडल्याचे सांगून, त्याच दिवशी कथित मृत्युपत्र पुन्हा पाठवले.
( नक्की वाचा : करिश्मा कपूरची मुलगी समायराच्या एका सेमिस्टरची फी किती? प्रिया सचदेवनं दाखवली पावती, आकडा समजल्यावर बसेल धक्का )
सूरी यांना कार्यकारी म्हणून नियुक्त करण्याचा आणि त्यांना कळवण्याचा अधिकार (authority) दिनेश अग्रवाल यांना कोणी दिला, हा कळीचा प्रश्न आहे. कायदेशीर तज्ज्ञांच्या मते, कार्यकारीला नियुक्तीबद्दल मृताकडून नव्हे, तर मध्यस्थाकडून कळणे, हे नियमांविरुद्ध आहे आणि यातून अनेक कायदेशीर त्रुटी (red flags) समोर येतात. सूरी यांनी दिनेश अग्रवाल यांना वकिलांशी बोलण्यास मदत करण्याची विचारणा केली, पण त्यांना कोणतेही उत्तर मिळाले नाही.
प्रिया कपूर 'नोमिनी' की 'लाभार्थी'?
प्रिया कपूर यांनी 11 August रोजी न्यायालयात स्पष्ट केले आहे की, त्या संजय कपूर यांच्या मालमत्तेच्या फक्त 'नोमिनी' (nominee) आहेत, 'लाभार्थी' (beneficiary) नाहीत. भारतीय वारसा कायद्यानुसार, नोमिनी केवळ विश्वासाने मालमत्ता धारण करतात; त्यांना ती वारसा हक्काने मिळत नाही. या स्पष्टीकरणामुळे मालमत्तेवर पूर्ण मालकी हक्क सांगण्याच्या प्रिया कपूर यांच्या प्रयत्नांना मोठा धक्का बसला आहे आणि त्यांनी सादर केलेल्या मृत्युपत्राच्या हेतूवर गंभीर संशय निर्माण झाला आहे, असा दावा करिश्मा कपूर यांच्यावतीनं दिल्ली उच्च न्यायालयात करण्यात आला.