जाहिरात

करिश्मा कपूरची मुलगी समायराच्या एका सेमिस्टरची फी किती? प्रिया सचदेवनं दाखवली पावती, आकडा समजल्यावर बसेल धक्का

Sunjay Kapur Property Case : दिवंगत व्यावसायिक संजय कपूर यांच्या संपत्तीवरून सुरू असलेला वाद आता अधिकच पेटला आहे.

करिश्मा कपूरची मुलगी समायराच्या एका सेमिस्टरची फी किती? प्रिया सचदेवनं दाखवली पावती, आकडा समजल्यावर बसेल धक्का
Samaira Kapoor college fees : करिश्मा कपूरच्या मुलीच्या कॉलेजची फी किती आहे?
मुंबई:

Sunjay Kapur Property Case : दिवंगत व्यावसायिक संजय कपूर यांच्या संपत्तीवरून सुरू असलेला वाद आता अधिकच पेटला आहे. या वर्षी जूनमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या कोट्यवधींच्या मालमत्तेवरून मोठा वादंग निर्माण झाला आहे. या प्रकरणात, संजय कपूर यांची पहिली पत्नी करिश्मा कपूर यांची मुलगी समायरा कपूर आणि त्यांच्या भावाने संजय यांची सध्याची पत्नी प्रिया सचदेव यांच्या विरोधात कोर्टात याचिका दाखल केली आहे. त्यांनी संजय यांच्या मृत्यूपत्रात (Will) फेरफार करण्यात आल्याचा आरोप केला आहे.

कोर्टात काय घडलं?

या मालमत्ता वादाची नियमित सुनावणी कोर्टात सुरू आहे. मागील सुनावणीदरम्यान करिश्मा कपूर यांची मुलगी समायरा कपूरने कोर्टात हा गंभीर आरोप केला होता की, तिची दोन महिन्यांची कॉलेज फी अजूनपर्यंत भरण्यात आलेली नाही. यावर कोर्टाने दोन्ही पक्षांना अशा प्रकारचा 'मेलोड्रामा' न करण्याची सक्त ताकीद दिली होती.

या आरोपाला उत्तर म्हणून आता प्रिया सचदेव कपूर यांचे वकील शैल त्रेहन यांनी कोर्टात समायराची फी भरल्याची पावती सादर केली आहे. वकिलांनी मुलांची युनिव्हर्सिटी फी भरली गेली नसल्याच्या दाव्याचे खंडन करत अनेक महत्त्वाचे दस्तावेज कोर्टात सादर केले आहेत.

( नक्की वाचा : Sunjay Kapur Property : संजय कपूर यांच्या 'विल'बाबत संशय; प्रिया कपूर यांच्या भूमिकेमुळे कोर्टात खळबळ )
 

एका सेमिस्टरची किती आहे फी?

वकील शैल त्रेहन यांनी कोर्टासमोर एका सेमिस्टरसाठी 95 लाख रुपये (95 lakh) एवढ्या मोठ्या रकमेच्या फीची पावती सादर केली. या पावतीच्या माध्यमातून त्यांनी हे स्पष्ट केले की, ही फी पूर्वीच भरण्यात आली आहे. वकिलांनी पुढे माहिती दिली की, पुढील सेमिस्टरच्या फीचा पुढचा हप्ता डिसेंबर महिन्यात जमा करायचा आहे. या महत्त्वपूर्ण खुलास्यामुळे समायराच्या फी भरण्यावरून सुरू असलेल्या वादावर पडदा पडला आहे.

समायरा कपूर काय घेत आहे शिक्षण?

समायरा कपूरनं तिचे सुरुवातीचे शिक्षण अमेरिकन स्कूल ऑफ बॉम्बेमधून पूर्ण केले आहे. सध्या ती उच्च शिक्षणासाठी अमेरिकेतील मॅसाच्युसेट्स येथील टफ्ट्स युनिव्हर्सिटीमधून (Tufts University) पदवीचे शिक्षण (Graduation) घेत आहे. करिश्मा कपूरची मुलगी असूनही समायरा लाइमलाइट आणि ग्लॅमरपासून दूर राहायला आवडते आणि तिचे सोशल मीडिया अकाउंटही खासगी (Private) आहे.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com