जाहिरात

Sunjay Kapur : संजय कपूरच्या 30,000 कोटींच्या संपत्तीमधील करिश्मा आणि मुलांना काय मिळणार?

Sunjay Kapur Property: बॉलिवूड अभिनेत्री  करिश्मा कपूरचा माजी पती आणि अब्जाधीश व्यावसायिक संजय कपूर यांचा 12 जून रोजी लंडनमध्ये अचानक मृत्यू झाला.

Sunjay Kapur : संजय कपूरच्या 30,000 कोटींच्या संपत्तीमधील करिश्मा आणि मुलांना काय मिळणार?
sunjay kapur rs 30000 crore property: करिश्मा आणि मुलांना संजय कपूरच्या संपत्तीमधून काय मिळणार? इथं वाचा
मुंबई:

Sunjay Kapur Property: बॉलिवूड अभिनेत्री  करिश्मा कपूरचा माजी पती आणि अब्जाधीश व्यावसायिक संजय कपूर यांचा 12 जून रोजी लंडनमध्ये अचानक मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, गॉर्ड्स पोलो क्लबमध्ये पोलो खेळताना त्यांना अस्वस्थ वाटू लागले आणि थोड्या वेळाने त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांचा जागीच मृत्यू झाला. जवळच्या सूत्रांनुसार, खेळत असताना एक मधमाशी त्यांच्या गळ्यामध्ये गेली आणि तिच्या दंशामुळे हा हृदयविकाराचा झटका आला.

संजय कपूर सोना कॉमस्टार (Sona Comstar) या जगातील प्रमुख ऑटो कंपोनेंट कंपन्यांपैकी एक असलेल्या कंपनीचे चेअरमन होते. 2015 मध्ये त्यांचे वडील डॉ. सुरिंदर कपूर यांच्या निधनानंतर त्यांनी कंपनीची सूत्रे हाती घेतली आणि तिचा विस्तार नवीन बाजारपेठांपर्यंत केला.

( नक्की वाचा : Sunjay Kapur : 30 हजार कोटी संपत्तीच्या वादात संजय कपूरच्या पत्नीचा मोठा निर्णय! )
 

कोण असेल उत्तराधिकारी?

कंपनीचे बाजार भांडवल (market cap) सुमारे 31,000 कोटी रुपये (4 बिलियन डॉलर) आहे. संजयच्या निधनानंतर कंपनीच्या शेअरमध्ये 7% घसरण झाली आणि उत्तराधिकारी कोण असेल याबद्दल चर्चा सुरू झाली. कंपनीने एक निवेदन जारी करत म्हटले की, "संजय कपूर यांची दूरदृष्टी आणि मेहनत नेहमीच आमच्या कंपनीसाठी प्रेरणादायी राहील. आम्ही आमच्या ग्राहकांना, कर्मचाऱ्यांना आणि भागधारकांना (shareholders) खात्री देतो की कंपनीचे कामकाज सुरळीत सुरू राहील". सध्या कंपनीचे व्यवस्थापन मंडळाकडून (management board) केले जात आहे आणि नुकतीच जेफ्री मार्क ओवर्ली यांची नवे चेअरमन म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

आई रानी कपूर यांचे आरोप

संजय कपूर यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या वारसा हक्कावरून कुटुंबात वाद सुरू झाला. त्यांची आई रानी कपूर यांनी आरोप केला आहे की, दुःखाच्या काळात त्यांना महत्त्वाच्या निर्णयांपासून दूर ठेवले गेले आणि काही कागदपत्रांवर जबरदस्तीने सह्या घेण्यात आल्या. त्यांनी कंपनीच्या बोर्डावर आरोप केला की, कुटुंबाच्या सहमतीशिवाय संजय यांची पत्नी प्रिया सचदेव कपूर यांना नॉन-एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर बनवण्यात आले. मात्र, कंपनीने हे आरोप फेटाळून लावले आणि सांगितले की रानी कपूर यांच्याकडे 2019 पासून कोणतेही शेअर्स नाहीत आणि सर्व निर्णय नियमांनुसारच घेण्यात आले आहेत.

( नक्की वाचा : Sunjay Kapur: 'कागदपत्रांवर सही करण्यासाठी दबाब... संजय कपूरच्या आईच्या पत्रानं खळबळ!)
 

करिश्मा आणि त्यांच्या मुलांना काय मिळाले?

फोर्ब्सच्या मते, संजय कपूर यांची एकूण संपत्ती सुमारे 1.2 बिलियन डॉलर (10,300 कोटी रुपये) होती. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मृत्युपत्र (will) आणि ट्रस्टनुसार, संपत्तीची जबाबदारी आता त्यांची पत्नी प्रिया सचदेव कपूर यांच्याकडे जाईल. याचा अर्थ, त्यांचा मुलगा अजेरियसचा हिस्सा अप्रत्यक्षपणे त्याच्या आईद्वारे व्यवस्थापित केला जाईल.

संजयचे दुसरे लग्न अभिनेत्री करिश्मा कपूरसोबत झाले होते. 2016 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला होता. या लग्नापासून झालेली त्यांची मुले समायरा (20) आणि कियान (14) यांच्यासाठी आधीच आर्थिक व्यवस्था करण्यात आली होती. रिपोर्ट्सनुसार, दोन्ही मुलांना 14 कोटी रुपयांचे बॉंड्स भेट म्हणून दिले होते. तसेच, त्यांना दरमहा 10-10 लाख रुपयांचे नियमित उत्पन्न सुनिश्चित केले आहे. याव्यतिरिक्त, संजय कपूर यांच्या वडिलांच्या नावावर असलेली एक प्रॉपर्टी (घर) करिश्मा कपूरला कस्टडी अलॉटमेंटच्या वेळी देण्यात आली होती.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com