Dharmendra And Hema Malini: ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra Health) यांची प्रकृती 10 नोव्हेंबर रोजी अचानक बिघडली, यानंतर त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. दुसऱ्या दिवशी त्यांच्या निधनाच्या अफवा पसरू लागल्या. पण कुटुंबीयांना निधनाचे वृत्त खोटे असल्याचे स्पष्ट केले. धर्मेंद्र यांची पत्नी हेमा मालिनी यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत माहिती दिली की, धर्मेंद्र यांची प्रकृती हळूहळू सुधारत आहे.
हेमा मालिनी या धर्मेंद्र यांच्या दुसऱ्या पत्नी आहेत तर प्रकाश कौर असे त्यांच्या पहिल्या पत्नीचे नाव आहे. बॉबी देओल (Bobby Deol) आणि सनी देओल (Sunny Deol) प्रकाश कौर आणि धर्मेंद्र यांची मुलं आते. ईशा देओल आणि अहाना देओल या हेमा मालिनी- धर्मेंद्र यांच्या मुली आहेत.
सनी देओल आणि बॉबी देओल हेमा मालिनींना कोणत्या नावाने हाक मारतात?
पण सनी आणि बॉबी देओल हेमा मालिनींना कोणत्या नावाने हाक मारतात? असा प्रश्न एका चाहत्याने विचारला होता. एका मुलाखतीमध्ये हेमा यांनी प्रश्नाचे उत्तरही दिलं होतं. एका चाहत्याने फोनवरुन हेमा मालिनींना विचारलं होते की, सनी आणि बॉबी तुम्हाला कोणत्या नावाने हाक मारतात? यावर हेमा यांनी सांगितलं की, "ते मला हेमाजी असं म्हणतात".
त्यांच्या उत्तराने उपस्थितांना आश्चर्य वाटले. याबाबत पुढे हेमा मालिनी यांनी सांगितलं की, धर्मेंद्र आणि त्यांच्या कुटुंबामध्ये नेहमीच सन्मानपूर्वक नाते राहिलंय आणि त्यांना कधीही वैयक्तिक नातेसंबंधांबद्दल सार्वजनिकपणे चर्चा करायला आवडत नाही.
(नक्की वाचा: Dharmendra Net Worth: धर्मेंद्र यांची एकूण संपत्ती किती? 100 एकर जागेत बनवलंय फार्म हाऊस, वाचा सर्व डिटेल्स)
दोन्ही कुटुंबांमध्ये कसे आहे नाते?
विशेषतः म्हणजे धर्मेंद्र यांची पत्नी असूनही हेमा मालिनी कधीही त्यांच्या कुटुंबाच्या घरात राहिल्या नाहीत. धर्मेंद्र यांची पहिली पत्नी प्रकाश कौर अजून त्यांच्या दोन्ही मुलांसह त्याच घरात राहतात. तर हेमा मालिनी यांनी ईशा आणि अहानासाठी त्याच परिसरात स्वतंत्र घर तयार केले होते, जेणेकरून दोन्ही कुटुंबामध्ये सन्मानपूर्वक नातं टिकून राहील.