बॉलिवूड अभिनेत्री सनी लियोननं मनोरंजन विश्वात स्वत:चं स्थान निर्माण केलंय. सनीनं मोजक्याच सिमेमात कामं केलंय. तिच्या अभिनयापेक्षा आयटम साँगचे जास्त चाहते आहेत. त्याचबरोबर सनीचे फोटो शूट्स देखील लक्षवेधी असतात. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका रिपोर्टनुसार सनी लियोनची संपत्ती 115 कोटी रुपये आहे. गेल्या काही काळापासून एकही सिनेमा न करणाऱ्या सनीकडं इतकी संपत्ती कशी? याचं तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल. सनीच्या संपत्तीचे सोर्स काय आहेत? कोणत्या माध्यमातून तिला जास्त कमाई होते पाहूया
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सनी लियोननं चित्रपट सृष्टीत पदार्पण केलं त्यावेळी तिची जोरदार चर्चा झाली. काही मोजके सिनेमे केल्यानंतर ती पुन्हा दिसली नाही. त्यामुळे तिचं इतकं उत्पन्न कसं हा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. सनी लियोनचा स्वत: चा एक कॉस्मेटिक ब्रँड आहे. तो तिनं 2016 साली लॉन्च केला होता. त्यामध्ये अनेक दमदार आणि महागडे प्रॉडक्टस आहेत. या प्रोडक्टसला मार्केटमध्ये मोठी मागणी आहे. या माध्यमातून सनीची मोठी कमाई होते.
बिझनेस वुमन आहे बेबी डॉल गर्ल
सनी लियोन वीगन कपड्यांमध्ये गुंतवणूक करुनही चांगली कमाई करते. 2021 मध्ये सनीनं या ब्रँडमध्ये गुंतवणूक केलीय. या गुंतवणुकीतूनही तिला चांगले रिटर्नस मिळतात. कॉस्मेटिक ब्रँडसह सनी लियोन परफ्यूमच्या व्यवसायात देखील सक्रीय आहे. अभिनेत्रीनं दोन नवे ब्रँड लॉन्च केले आहेत. या परफ्यूमची मार्केटमध्ये चांगली मागणी आहे. या व्यवसायातूनही सनीला चांगलं उत्पन्न मिळतं.
( नक्की वाचा : भाडं देण्यासाठी नव्हते पैसे, बॉलिवूड पदार्पण ठरलं फ्लॉप! आज एका सिनेमासाठी घेतो 12 कोटी )
ऑनलाईन गेममध्येही सक्रीय
एका रिपोर्टनुसार सनी लियोननं 2018 साली ऑनलाईन गेममध्ये पदार्पण केलं. त्यावेळी तिनं एका ऑनलाईन गेम डेव्हलपमेंट कंपनीबरोबर करार करत स्वत:चा ऑनलाईन गेम तयार करण्यावर काम सुरु केलं आहे. ऑनलाईन गेमसह प्रत्यक्ष गेममध्येही सनीनं पाऊल टाकलंय. ती ब्रिटनमधील एका फुटबॉल टीमची ओनर आहे.
सनीनं अभिनयातच नाही तर लेखनामध्येही गुणवत्ती सिद्ध केलीय. 2019 साली सनीनं जगरनॉट बुक्सचे संस्थापक चिकी सरकार यांच्या मदतीनं 12 स्वीट ड्रीम पुस्तकं लिहिली आहेत. या पुस्तकांना सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलं. त्यामधून सनीच्या कमाईमध्ये आणखी एक स्रोत वाढला. 2012 साली डिजिटल प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करणारी सनी ही पहिली भारतीय अभिनेत्री आहे. तिनं स्वत:चा एनएफटी देखील बनवला होता.