Ranveer Allahabadia : 'तुझ्या डोक्यात घाण भरली आहे'; रणवीर अलाहाबादियाला सर्वोच्च न्यायालयाने अत्यंत वाईट शब्दात फटकारलं!

रणवीर अलाहाबादिलाने केलेल्या वक्तव्यावर सर्वोच्च न्यायालयाने अत्यंत तिखट शब्दात प्रतिक्रिया दिली.

जाहिरात
Read Time: 2 mins

india's got latent वादावरील याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने रणवीर अलाहाबादियाला (Supreme Court on Ranveer Allahabadia)  कडक शब्दात फटकारलं. सर्वोच्च न्यायालयाकडून रणवीर अलाहाबादिया याला दिलासा मिळाला असला तरी सर्वोच्च न्यायालयाने रणवीरने केलेल्या वक्तव्यावरुन संताप व्यक्त केला.

सर्वोच्च न्यायालयाकडून रणवीरची कडक शब्दात कानउघडणी...

  1. न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले, तुम्ही ज्या शब्दांचा वापर केलाय त्यामुळे आई-वडिलांना लाज वाटली असेल. बहिणींनाही लाज वाटली असेल. संपूर्ण समाजासाठी हे वक्तव्य अत्यंत लज्जास्पद आहे. ही विकृत मानसिकता आहे. तुम्ही आणि तुझ्यासोबतच्या गुंड प्रवृत्ती असलेल्यांनी ही विकृती दाखवली आहे. 
  2. अलाहाबादियाला मिळणाऱ्या धमक्यांवर सर्वोच्च न्यायालय म्हणाले, जर तुम्ही चीप पब्लिसिटीसाठी अशा प्रकारच्या भाषेचा वापर कराल तर दुसरेही अशा प्रकारची भाषा वापरतील आणि जीभ कापण्याबद्दलही बोलतील. 
  3. न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले, त्यांनी आपल्या आई-वडिलांबद्दल जे वक्तव्य केलंय त्याची त्यांना लाज वाटली पाहिजे. आम्ही आयवरी टॉवरमध्ये नाही. त्याने कोणत्या शोमधून हा कंटेट चोरी केला हे आम्हाला माहीत आहे. 
  4. न्यायमूर्ती कोटिश्वर सिंहने सांगितलं, जर पोलीस तुम्हाला चौकशीसाठी बोलावत असेल तर ते तुम्हाला सुरक्षाही देतील. यासाठी तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. 
  5. विकृत भाषेचा वापर... सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की, त्यांनी अत्यंत विकृत भाषेता वापर केला आहे आणि अशावेळी कायदा आपलं काम करेल. 
  6. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी रणवीरच्या वकिलाला विचारलं की, अश्लीलता आणि असभ्यतेचे निकष काय आहेत?
  7. डोक्यात घाण भरली आहे...सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं, तुझ्या डोक्यात घाण भरलेली आहे असं वाटतं. म्हणूनच शोमध्ये तू अशा प्रकारची भाषा वापरली. 
  8. तुम्ही प्रसिद्ध आहात, म्हणून काहीही बोलू शकत नाही  आणि समाजाकडे दुर्लक्ष करू शकत नाही. जगातील कोणत्याही व्यक्तीला अशा प्रकारची भाषा आवडेल का?