Suraj Chavan: सुरज चव्हाणनं घेतली अजित पवारांची भेट; ट्विटमध्ये उल्लेख असलेल्या 'त्या' घराचं रहस्य काय?

Suraj Chavan News:  बिग बॉस मराठी' सिझनचा विजेता आणि बारामतीकर सुरज चव्हाण याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सदिच्छा भेट घेतली.

जाहिरात
Read Time: 3 mins
Suraj Chavan Ajit Pawar : अजित पवार यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे.
मुंबई:

Suraj Chavan News:  बिग बॉस मराठी' सिझनचा विजेता आणि बारामतीकर सुरज चव्हाण याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सदिच्छा भेट घेतली. विशेष म्हणजे, या भेटीची माहिती खुद्द अजित पवारांनी आपल्या अधिकृत 'X' (पूर्वीचे ट्विटर) अकाउंटवरून पोस्ट करत दिली.  त्यामुळे याची चर्चा सुरु झाली आहे.

सुरज चव्हाणने अजित पवार यांची भेट घेतल्यानंतर, अजित पवारांनी तत्काळ सोशल मीडियावर ही माहिती शेअर केली.अजित पवारांनी ट्विटमध्ये म्हटले आहे: "बारामतीचा सुपुत्र आणि बिग बॉस मराठी विजेता सुरज चव्हाण यानं आज माझी सदिच्छा भेट घेतली. त्याच्या नवीन घराचं बांधकाम उत्तमरित्या पार पडत असून त्याबद्दल त्यानं माझ्याकडे समाधान व्यक्त केलं. यावेळी सुरजला पुढील वाटचालीसाठी, आयुष्यातील नव्या टप्प्यासाठी शुभेच्छा दिल्या.

या भेटीदरम्यान सूरजने त्याच्या नवीन घराच्या बांधकामाविषयी समाधान व्यक्त केल्याचेही अजित पवारांनी स्पष्ट केले आहे.

काय आहे घराचा विषय?

बिग बॉस मराठी'च्या घरात असताना सुरज चव्हाणने अनेकदा त्याच्या गावी हक्काचं घर बांधण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्याच्या मनात घर करून राहिलेले हे स्वप्न पूर्ण करण्याचा शब्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्याला दिला होता.

अजित पवार यांनी केवळ आश्वासन देऊन थांबले नाहीत, तर त्यांनी हे काम मार्गी लावण्यासाठी सूचनाही दिल्या. सूरजला शब्द दिल्यानंतर त्यांनी लागलीच जागेवरून संबंधित अधिकाऱ्यांशी आणि कामाच्या लोकांशी फोनवरून संपर्क साधत घर बांधण्यासाठी आवश्यक असणाऱ्या हालचाली सुरू केल्या होत्या. यापूर्वी ऑक्टोबर 2024 मध्ये सूरजच्या घरी जाऊन अजित पवारांनी त्याची भेट घेतली होती. 

Advertisement

( नक्की वाचा : Rashid Khan: राशिद खानच्या दुसऱ्या लग्नामुळे खळबळ; 'ती' कोण? नेटिझन्सनी शोधले फोटो, काय आहे प्रकरण? )
 

लवकरच विवाहबंधनात अडकणार 'गुलिगत' फेम सूरज चव्हाण

सुरज चव्हाणच्या आयुष्यातील आणखी एक मोठा टप्पा लवकरच सुरू होणार आहे. 'गुलिगत' फेम सूरज चव्हाण येत्या 29 नोव्हेंबर रोजी लग्न करणार आहे. या कारणामुळेही तो सध्या खूप चर्चेत आहे.

सुरजचा विवाह सोहळा पुण्याजवळील जेजुरी, सासवड येथे पार पडणार असून, या मुख्य समारंभाआधी 28 नोव्हेंबरपासून मेहंदी, हळद आणि संगीताचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. सध्या सूरज लग्नाची खरेदी आणि इतर तयारीमध्ये व्यस्त आहे.

Advertisement

सुरज चव्हाणचे हे अ‍ॅरेंज मॅरेज नसून तो त्याचे 'लव्ह मॅरेज' करत आहे. त्याच्या होणाऱ्या बायकोचे नाव संजना असून, ती त्याच्या चुलत मामाची मुलगी आहे. सूरज आणि संजना दोघेही एकमेकांना लहानपणापासून ओळखतात.

लहानपणीची ओळख पुढे प्रेमात रूपांतरित झाली. विशेष म्हणजे, सुरजने एका मुलाखतीत सांगितले होते की, त्याने संजनाला कधीही प्रपोज केले नाही; त्यांच्यात नकळत प्रेमाचे सूर जुळले. दोघांनीही आपल्या प्रेमाची कबुली मिळाल्यावर घरच्यांच्या संमतीनेच लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे.

Advertisement

( नक्की वाचा : Dharmendra Health : धर्मेद्रसाठी फॅनच्या डोळ्यात पाणी! चाहत्याचं प्रेम पाहून 'धरम पाजी'ही होतील भावुक, VIDEO )
 

बिग बॉस'मधील सहकाऱ्यानं दिलं केळवण

लग्नापूर्वीची प्रथा म्हणून सुरज चव्हाण याचे केळवण नुकतेच झाले. सुरजच्या 'बिग बॉस'मधील सहकारी अंकिता वालावलकर हिने त्याला हे खास केळवण दिले. सुरजने या केळवणाचा व्हिडीओ त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे.

या व्हिडीओला आतापर्यंत 3 लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिले असून हजारो लोकांनी लाईक करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. व्हिडीओमध्ये अंकिताने अगदी पारंपारिक पद्धतीने त्याचे केळवण करताना दिसत आहे. या दोघांनी केळवणाला बसण्यापूर्वी घेतलेले गोड नाव देखील चाहत्यांच्या कौतुकाचा विषय ठरले आहे.

Topics mentioned in this article