Sushant Singh Rajput Death Reason : दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची बहीण श्वेता सिंह किर्तीने भावाच्या मृत्यूबाबत मोठा खुलासा केला आहे. यामुळे बॉलिवूडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. नुकत्याच एका मुलाखतीत श्वेताने दावा केला आहे की, दो मानसोपचारतज्ज्ञ, यामध्ये एक यूनायटेड स्टेट्सचा आणि दुसरा मुंबईचा आहे. सुशांतचा मर्डर दोन लोकांनी केला आहे. त्याचा मृत्यू आत्महत्येमुळं झालेला नाहीय, असं श्वेताने म्हटलं आहे. सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू जून 2020 मध्ये झाला होता. हे प्रकरण खूप महिने चर्चेत होतं. याप्रकरणी सीबीआय, ईडी आणि एनसीबीने तपास केला होता.
यावर श्वेता सिंह किर्तीने म्हटलंय की, सुशांतच्या कथित मृत्यू प्रकरणात तिने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. शुभांकर मिश्राच्या पॉडकास्टमध्ये श्वेता म्हणाली, आत्महत्या कशी होऊ शकते? जर तुम्हाला गळफास घ्यायचा असेल, तर तुम्ही स्टूलचा वापर कराल ना? पण तिथे स्टूलसारखं काहीच नव्हतं. सुशांतच्या गळ्यावर जे निशाण होते, ते कपड्यांनी लागणारे नव्हते. जर तुम्ही ते निशाण पाहिले असतील, तर ते निशाण दुपट्ट्याचे नव्हते. एक चेन टाईमचा हलका निशणा होता. सुशांतच्या मृत्यूच्या काही वेळानंतर मानसोपचार तज्ज्ञांनी माझ्याशी (श्वेता) बोलणं केलं. ज्यामध्ये एक यूएस आणि दुसरा मुंबईचा होता. ते ऐकमेकांना ओळखत नव्हते. पण त्यांनी तेच सर्व सांगितलं, जे घडलं होतं.
नक्की वाचा >> रामायण, हनुमान अन् नरसिंहाचा अवतार..आता 'या' अभिनेत्रीनं दाखवला रुद्रावतार! महाकालीचा पोस्टर पाहून धडकीच भरेल
श्वेता सिंह किर्तीने मुलाखतीत केले धक्कादायक खुलासे
श्वेता सिंह किर्तीने म्हटलं की, माझ्याशी ज्या लोकांनी बोलणं केलं, त्यात अमेरिकेकेची एक मानसोपचारतज्ज्ञ होती. तिला माहितच नव्हतं की, मी कोण आहे आणि माझा भाऊ कोण आहे..तिने म्हटलं की, त्याचा मर्डर झाला आहे. दोन लोक आले होते. त्यात एक मुंबईचा मानसोपचारतज्ज्ञ होता. त्यानेही मला एक सारख्याच गोष्टी सांगितल्या. ज्या गॉडमदरने आम्हाला सांगितल्या होत्या. दोघांनाही सांगितलं की, दोन लोक आले आणि त्याचा मर्डर करून गेले.
रिया चक्रवर्तीच्या त्या पोस्टवर साधला निशाणा
मुलाखतीत श्वेताने पुढं म्हटलं की, माझ्या भावाचं करिअर पुढे जात होतं. बॉलिवूड इंडस्ट्री कशी आहे, याबाबत मला माहित नव्हतं. एक कॉलही आला होता, त्यात सांगण्यात आलं होतं की, तो जगणार नाही. कारण त्याच्या काळी जादू केली आहे. रिया चक्रवर्तीने एक क्रिप्टिक पोस्ट शेअर केली होती. ज्यामध्ये सुशांतचा फोटो होता. माझ्या भावाने त्याला लाईक केलं होतं. त्या पोस्टमध्ये लिहिलं होतं, तू खूप उंच उडत आहेस. तुझे पंख छाटावे लागतील. मला हे सर्व खूप वेगळंच वाटलं.
नक्की वाचा >> Anaya Bangar : गोलंदाजांची आता खैर नाही! अनाया बांगर या नावाने उतरणार क्रिकेटच्या मैदानात, GYM चा व्हिडीओ शेअर करत म्हणाली..