VIDEO अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडचे कमबॅक, महेश मांजरेकरांच्या लेकीचीही मालिका विश्वात एण्ट्री, प्रोमो पाहिला?

Prajakta Gaikwad News: स्टार प्रवाहवरील नवीन मालिका 'पाठराखीण' मधून अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड 5 वर्षांनंतर पुनरागमन करत आहे. सोबतच गौरी इंगवलेचे मालिका विश्वात पदार्पण. जाणून घ्या दोन बहिणींच्या या अनोख्या गोष्टीबद्दल सविस्तर.

जाहिरात
Read Time: 3 mins
"Prajakta Gaikwad News: प्राजक्ता गायकवाडचे छोट्या पडद्यावर कमबॅक"
Star Pravah Channel

Prajakta Gaikwad News: 'पाठराखीण' ही नवीकोरी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. प्रत्येक संकटात आणि प्रत्येक वेदनेत एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या भाग्यश्री आणि प्राजक्ता या दोन बहि‍णींची गोष्ट स्टार प्रवाहवरील या मालिकेत पाहायला मिळणार आहे. दोन बहिणींच्या नात्यातील निस्सीम प्रेम, त्याग आणि जिव्हाळा या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. सुख-दुःखात नेहमी सोबत असणाऱ्या या बहिणींचं आयुष्य मात्र एका अनपेक्षित वळणावर बदलतं. 

दोन दमदार अभिनेत्री येतायेत प्रेक्षकांच्या भेटीला

परिस्थिती, समाज आणि नियती यांच्या कसोटीवर त्यांचं नातं कसं टिकून राहतं, याची उत्कंठावर्धक मांडणी या मालिकेतून पाहायला मिळणार आहे. स्टार प्रवाहवर लवकरच सुरू होत असलेल्या या मालिकेच्या निमित्ताने सुप्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड तब्बल पाच वर्षांनंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. तर  सिनेमांच्या माध्यमातून आपल्या अभिनयाची छाप पाडलेली अभिनेत्री गौरी इंगवले पाठराखीणच्या निमित्ताने मालिका विश्वात दमदार एण्ट्री घेणार आहे.   

Advertisement

आतापर्यंत साकारलेल्या भूमिकांपेक्षा वेगळी भूमिका: प्राजक्ता गायकवाड

पुन्हा एकदा मालिका विश्वात पुनरागमन करताना नेमकी काय भावना आहे हे सांगताना प्राजक्ता म्हणाली,"पुन्हा प्रेक्षकांना भेटण्यासाठी मी प्रचंड उत्सुक आहे. खूप दिवसांपासून मालिका कधी करणार यासाठी विचारणा होत होती. पाठराखीण मालिकेच्या निमित्ताने ही सुवर्णसंधी चालून आली. 'स्टार प्रवाह'सारखी लोकप्रिय वाहिनी आणि बांदेकर कुटुंबीयांच्या 'सोहम प्रोडक्शन'सारखी निर्मिती संस्था असताना नाही म्हणण्याचं कारणच नव्हतं. मध्यंतरीच्या काळात बरेच मराठी आणि दाक्षिणात्य चित्रपट केले, अनेक जाहिराती केल्या. टीव्ही हे माझं अत्यंत आवडतं माध्यम आहे. आतापर्यंत साकारलेल्या भूमिकांपेक्षा वेगळी भूमिका आहे. प्राजक्ता कुलकर्णी असं माझ्या व्यक्तिरेखेचं नाव आहे. लहान वयातच आई-वडिलांचं छत्र गमावलेल्या प्राजक्ताचा सांभाळ तिचे मामा चंद्रशेखर वैद्य यांनी केला. तिच्यासाठी मामा-मामी म्हणजे जणू विठ्ठल-रखुमाई. त्यांचा प्रत्येक शब्द तिच्यासाठी अंतिम आहे. वैद्य कुटुंबावर तिचं अपार प्रेम आहे आणि या घराचं भलं व्हावं यासाठी ती काहीही करू शकते". प्रेक्षकांनी या भूमिकेलाही प्रेम द्यावं ही अपेक्षा आहे, असंही प्राजक्ता म्हणाली.

(नक्की वाचा: Aamir Khan: आमिर खानने स्वीकारली आयुष्यातील ती चूक, गौरी स्प्रॅटबाबत केले मोठे विधान; लग्न न टिकण्याचंही सांगितलं कारण)

माझी इच्छापूर्ती होतेय : गौरी इंगवले

अभिनेत्री गौरी इंगवले देखिल मालिका विश्वात एण्ट्री घेण्यासाठी खूप उत्सुक आहे. या भूमिकेबाबत गौरी म्हणाली की,"खूप दिवसांपासून मालिका करण्याची इच्छा होती. पाठराखीण मालिकेमुळे माझी इछापूर्ती होतेय असं म्हण्टलं तर वावगं ठरणार नाही. टीव्ही माध्यमात काम करण्याचा अनुभव खूप वेगळा आहे. या जगाशी नव्याने ओळख करुन घेतेय. मालिकेच्या माध्यमातून तुम्ही घराघरात पोहोचता. त्यामुळे खूप उत्सुक आहे. माझ्या कुटुंबीयांनी देखील खूप प्रोत्साहन दिलं. त्यामुळेच मी मालिका करण्याचा निर्णय घेतला. मला खात्री आहे ही मालिका आणि या मालिकेतील सगळी पात्रं प्रेक्षकांना नक्की आवडतील".   

(नक्की वाचा: 14व्या वर्षी वृद्धाशी लग्न! 1983मध्ये 44 सिनेमांमध्ये झळकली, अभिनेत्रीची शेवटची चिठ्ठी वाचून डोळ्यात येईल पाणी)

पाठराखीण मालिकेचा प्रोमो पाहा

Advertisement

सोहम आदेश बांदेकर यांच्या सोहम प्रोडक्शनने या मालिकेची निर्मिती केली आहे. सुप्रसिद्ध दिग्दर्शक राहुल लिंगायत या मालिकेचं दिग्दर्शन करणार आहेत. या मालिकेतून अनेक दिग्गज कलाकार भेटीला येणार आहेत. तेव्हा पाहायला विसरू नका नवी मालिका पाठराखीण लवकरच फक्त स्टार प्रवाहवर.