Tamannaah Bhatia : पिंपल्स घालवण्यासाठी तमन्नाचा किळसवाणा उपाय, ऐकून तुम्हीही म्हणाल ईssss!

Can Saliva Heal Acne: सेलिब्रिटींचं ऐकून कोणताही हॅक करण्यापेक्षा तज्त्रांचा सल्ला घेऊन त्यानंतर त्वचेसोबत प्रयोग करणं केव्हाही उपयुक्त. 

जाहिरात
Read Time: 2 mins
Does Saliva Help With Skin: थुंकी चेहऱ्याच्या त्वचेसाठी चांगली असते?

Celebrity Beauty: त्वचेची काळजी कशी घ्यावी, त्वचासंदर्भातील अडचणी कशा दूर कराव्यात, याबाबत सोशल मीडियावर वारंवार विविध पोस्ट व्हायरल होत असतात. अशात अभिनेत्री तमन्ना भाटिया हिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तमन्ना भाटिया हिने एका मुलाखतीत ती त्वचेची कशी काळजी घेते याचा खुलासा केला आहे. (Tamannaah bhatia uses saliva to cure pimples)

या व्हिडिओमध्ये अभिनेत्री तमन्ना भाटिया तिच्या स्किन केअरबद्दल सांगते. यावेळी तमन्ना पिंपल्स दूर ठेवण्यासाठी चेहऱ्यावर लाळ म्हणजेच सकाळी उठल्यानंतर थुंकी लावते. हे ऐकून अनेकांना कदाचित मस्करी वाटत असेल, मात्र हे खरं आहे. अशात खरंच सकाळची पहिली लाळ पिंपल्स कमी करू शकतात? तमन्नाचं म्हणणं आहे की, यामुळे पिंपल्स लवकर कमी होतात. यावर त्वचा तज्ज्ञांचं काय म्हणणं आहे, ते पाहूया. 


थुंकीमुळे पिंपल्स कमी होतात | Can Spit Cure Pimples


तमन्ना भाटियाच्या थुंकी लावण्याच्या उपाययावर फेशियल कॉस्मेटिक सर्जन डॉ. सपना वडेरा यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आगे. ज्यामध्ये सपना यांनी सांगितलं की, थुंकी चेहऱ्याला लावावी की नाही. यामुळे पिंपल्सवर काय परिणाम होतो. 

सपना यांनी सांगितलं की, आपल्या लाळेत एन्जाइम आणि अॅटीबॅक्टेरियल गुण असतात. जे काही काळासाठी पिंपल्सला सूदिंग इफेक्ट देऊ शकतात. मात्र लाळ किंवा थुंकी ही कायमची उपाययोजना नाही. याच्याशी संबंधित काही स्वच्छतेच्या समस्या आहेत. ज्यांची काळजी घेणे आवश्यक आहे. चेहऱ्यावर लाळ लावल्याने त्वचेला अनेक प्रकारच्या बॅक्टेरियांचा धोका निर्माण होऊ शकतो, ज्यामुळे फायद्यापेक्षा जास्त नुकसान होण्याची भीती असते.

Advertisement

सेलिब्रिटींचं ऐकून कोणताही हॅक करण्यापेक्षा तज्त्रांचा सल्ला घेऊन त्यानंतर त्वचेसोबत प्रयोग करणं केव्हाही उपयुक्त. 

कोणते घरगुती उपाय पिंपल्स कमी करू शकतात?

  • पिंपल्सवर कोरफडीचे जेल वापरल्याने पिंपल्स कमी होण्यास मदत होते. कोरफडीचे दाहक-विरोधी गुणधर्म प्रभावी ठरतात.
  • अ‍ॅपल सायडर व्हिनेगर पाण्यात मिसळून चेहऱ्यावर लावता येते. ते पिंपल्सवर पॅच ट्रीटमेंटप्रमाणे लावल्याने परिणाम दिसून येतो.
  • काकडीचा रस पिंपल्सवर लावल्याने सूंदिग इफेक्ट मिळतो आणि पिंपल्स कमी होऊ लागतो. 
  • हळदीची पेस्ट पिंपल्सवर फायदेशीर आहे. यातून बॅक्टेरियाही कमी होतो. 
  • मध आणि दालचिनीची पावडर एकत्र करीत पेस्ट तयार करून घ्या. ही पेस्ट चेहऱ्याला फेस मास्कऐवजी लावा. यातून चेहरा उजळ होतो आणि पिंपल्स कमी होतो. 
     
Topics mentioned in this article