Stunt Man Death Video: ॲक्शन सीनवेळी दुर्घटना, कार उलटून स्टंटमॅनचा मृत्यू, पाहा भयंकर VIDEO

Stunt master SM Raju death Viral Video: हा अपघात इतका भयानक होता की क्रू मेंबर्स घाबरले अन् सेटवर एकच गोंधळ उडाला. 

जाहिरात
Read Time: 2 mins

Stunt Artist SM Raju Death Video:  तमिळ चित्रपटसृष्टीतून एक दुःखद बातमी आली आहे. प्रसिद्ध स्टंट कलाकार राजू यांचे चित्रपटाच्या सेटवर अपघाती निधन झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, स्टंटॅन राजू चित्रपटाच्या सेटवर कार स्टंट करताना जखमी झाला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. अभिनेता विशालने कलाकार राजू यांच्या मृत्यूची माहिती दिली आहे. या दुर्घटनेनंतर सिनेविश्वातील दिग्गजांनी सोशल मीडियावरु स्टंटमॅन राजू यांना श्रद्धांजली वाहिली आहे. 

Kota Srinivasa Rao Death: सिनेसृष्टीवर शोककळा! 750 सिनेमे करणाऱ्या दिग्गज खलनायकाचे निधन

सिनेविश्वातील प्रसिद्ध स्टंटमॅन एसएम राजू यांचे एका सीनचे चित्रीकरण करताना निधन झाले. या अपघाताची काही भयानक दृश्येही समोर आली आहेत, स्टंटमॅन राजू वेगाने कार चालवताना दिसत आहेत आणि याच वेळी त्यांच्या कारचा भीषण अपघात झाला.  हा अपघात इतका भयानक होता की क्रू मेंबर्स घाबरले अन् सेटवर एकच गोंधळ उडाला. 

Advertisement

स्टंटमॅन राजूच्या मृत्यूनंतर सिनेविश्वात शोककळा पसरली आहे. एसएम राजूचा सहकारी आणि मित्र, अभिनेता विशालने स्टंटमॅन राजूच्या मृत्यूची पृष्ठी केली आहे एक्स वर शेअर केलेल्या भावनिक श्रद्धांजलीत, विशालने तीव्र दुःख व्यक्त केले. स्टंट कलाकार राजू यांचे स्टंट शूट करताना निधन झाले यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. मी राजूला इतक्या वर्षांपासून ओळखतो आणि त्याने माझ्या चित्रपटांमध्ये अनेक वेळा धोकादायक स्टंट केले आहेत. तो खूप धाडसी व्यक्ती होता, त्याच्या कुटुंबासोबत माझी मनापासून सहानुभूती आहे आणि त्याच्या आत्म्याला शांती लाभो, असं त्यांनी या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. 

Advertisement

TV Actress: मिरचीचा स्प्रे, नंतर चाकूहल्ला... 'त्या' संशयातून अभिनेत्रीवर पतीचा हल्ला

विशालने राजूच्या शोकाकुल कुटुंबाला आयुष्यभर आधार देण्याचाही शब्द दिला "या दुःखाच्या वेळी देव त्यांच्या कुटुंबाला अधिक शक्ती देवो. मी त्यांच्या कुटुंबाच्या भविष्यासाठी नेहमीच त्यांच्यासोबत राहीन, कारण मी देखील त्याच चित्रपट उद्योगातून आहे. असं ते म्हणाले. दुसरीकडे लोकप्रिय स्टंट कोरिओग्राफर स्टंट सिल्वा यांनीही इन्स्टाग्रामवर शोक व्यक्त केला आहे.

Advertisement

स्टंट कोरिओग्राफर स्टंट सिल्वा यांनी लिहिले, "आमच्या महान कार जंपिंग स्टंट कलाकारांपैकी एक, एसएम राजू यांचे आज कार स्टंट करताना निधन झाले, आमचे स्टंट युनियन आणि भारतीय चित्रपट उद्योग त्यांना नेहमीच लक्षात ठेवेल." एसएम राजू हे तमिळ चित्रपट उद्योगातील एक अनुभवी स्टंटमन होते, ज्यांनी अनेक चित्रपटांमध्ये धोकादायक स्टंट केले आहेत. सध्या, अभिनेता आर्य किंवा दिग्दर्शक पा रणजीत यांनी या घटनेबाबत कोणतेही अधिकृत विधान प्रसिद्ध केलेले नाही. 'वेट्टुवन' हा चित्रपट एक मल्टी-स्टारर चित्रपट असल्याचे वृत्त आहे, ज्यामध्ये शोभिता धुलिपाला, अट्टाकाठी दिनेश, कलैयारसन आणि लिंगेश यांच्याही भूमिका आहेत.