NetWorth : मुख्यमंत्री विजय थलपतींची पत्नी की जीवश्च मैत्रीण; कोण आहे सर्वात श्रीमंत? दोघींची नेटवर्थ किती?

विजय यांच्या मुख्यमंत्रि‍पदाच्या शपथविधी कार्यक्रमात अनेक गोष्टींची चर्चा झाली. या आनंदाच्या क्षणी त्यांची पत्नी संगीत सोरनलिंगम आणि मुलं उपस्थित नव्हते. मात्र थलपती यांची मैत्रिण तृषाच्या उपस्थितीनंतर वेगळीच चर्चा रंगली आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins

Sangeetha Sornalingam Trisha Krishnan Net Worth : तामिळनाडूचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री विजय थलपती यांनी आज सरकार स्थापनेसाठी आमदारांचं संख्याबळ असल्याचं बहुमत चाचणीत सिद्ध केलं. यावेळी त्यांना १४४ मतं तर विरोधात २२ मतं पडली. विजय यांच्या मुख्यमंत्रि‍पदाच्या शपथविधी कार्यक्रमात अनेक गोष्टींची चर्चा झाली. मात्र या आनंदाच्या क्षणी त्यांची पत्नी संगीत सोरनलिंगम आणि मुलं उपस्थित नव्हते. दरम्यान त्यांच्या पत्नीविषयी बरंच सर्च केलं जात आहे.

संगीता यांनी कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केल्याचंही सांगितलं जात आहे. याशिवाय विजय थलपती आणि अभिनेत्री तृषा यांच्यातील संबंधाबाबतही चर्चा रंगली आहे. दरम्यान थलपती यांची पत्नी संगीता कोण आहेत, त्यांची नेटवर्थ किती आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री शपथविधीदरम्यान चर्चेत असलेली त्यांची जवळची मैत्रिण अभिनेत्री तृषा यांची संपत्ती किती आहे?  जाणून घेऊया सविस्तर...

Advertisement

थलपती विजय यांच्या पत्नीची संपत्ती...

विजय थलपती यांची पत्नी संगीता सोरनलिंगमदेखील तामिळनाडूच्या चित्रपट आणि राजकीय वर्तुळातील सर्वात श्रीमंत महिलांपैकी एक आहे. मीडियामध्ये आलेल्या वृत्तांनुसार, त्यांची संपत्ती ४०० कोटींहून अधिक आहे. काही महिन्यांपूर्वी संगीता यांनी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केल्याचं सांगितलं जात आहे. त्यांनी पतीविरोधात विश्वासघात केल्याचा आरोप केला आहे. संगीता यांनी दावा केला आहे की, विजय एका अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंधात आहेत. 

संगीता यांचे पती लंडनमध्ये राहतात आणि श्रीलंकन वंशाचे प्रसिद्ध उद्योगपती आहेत. त्यांना अधिकांश संपती वडिलांच्या वारशातून मिळाली आहे. संगीता आणि थलपती विजय यांचं लग्न १९९९ मध्ये हिंदू आणि ख्रिश्चन विधीनुसार झालं होतं आणि या दाम्पत्याला तीन मुलंही आहेत. 

नक्की वाचा - तामिळनाडूच्या राजकारणात सिनेसृष्टीतील कलाकारांचं वर्चस्व का असतं? मोठी आहे यादी

कुठून येतात पैसे?

संगीता यांच्या कुटुंबाचा लंडनसह अनेक देशांमध्ये उद्योग आहे. त्यांची अधिकांश कमाई उद्योग आणि गुंतवणुकीतून होते. थलपती विजय यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांची पत्नी संगीता यांच्याकडे एक लाखांची कॅश आहे. त्यांचे तीन बँक अकाऊंट आहेत. यातील एका बँकेत १० कोटी रुपये, दुसऱ्या बँकेत ४७ लाख, तिसऱ्या बँकेत ९७,००० रुपये जमा आहेत. सोबतच त्यांच्याजवळ २ किलो चांदी आणि ३१३२ ग्रॅम सोनं आहे, ज्याची किंमत ४ कोटींच्या जवळपास आहे. संगीता यांच्याकडे १३५ कॅरेट्सचे डायमंड्स आहेत, ज्याची किंमत १ कोटींच्या घरात आहे.


विजय थलपती यांची मैत्रिण तृषा कृष्णन हिची संपत्ती किती आहे? 

दाक्षिणात्य चित्रपटातील टॉपची अभिनेत्री तृषा कृष्णन हिची नेटवर्थ तब्बल ८५ कोटी असल्याचं सांगितलं जातं. वृत्तांनुसार, ती एका चित्रपटासाठी ३ कोटी घेते. चित्रपटांव्यतिरिक्त ब्रँड एडोर्समेंट आणि जाहिरातीतूनही तिची मोठी कमाई होते. तृषा कृष्णन हिच्याजवळ अनेक लग्झरी गाड्या आहेत. ज्यामध्ये मर्सिडीज बेंज एस क्लास (Mercedes Benz S Class), बीएमडब्ल्यू 5 सीरीज (BMW 5 Series), रेंज रोवर इवोक (Range Rover Evoque) आणि मर्सिडीज बेंज ई क्लास (Mercedes Benz E Class) यांचा समावेश आहे. त्यांच्या कार कलेक्शनची किंमत ३ ते ४ कोटींचं असल्याचं सांगितलं जातं. याशिवाय चेन्नईमध्ये तिचं १० ते १२ कोटींचं घर आहे. हैद्राबादमध्येही तिची एक प्रिमियम प्रॉपर्टी असून त्याची किंमत ६ ते ७ कोटी आहे. 

Advertisement

तिघांची संपत्ती...

मुख्यमंत्री विजय थलपती  - ६२४ कोटी

पत्नी संगीता - ४०० कोटी  

मैत्रिण तृषा - ८५ कोटी