ब्लॅकमेलिंग, ड्रग्ज आणि डिव्होर्स! समंथावरील खळबळजनक आरोपानंतर मंत्री म्हणाल्या...

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

Samantha-Naga Divorce : तेलंगणामधील मंत्री कोंडा सुरेखा यांनी अभिनेत्री समंथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्य यांच्या घटस्फोटाबाबत केलेल्या वक्तव्यानं खळबळ उडाली आहे. या वक्तव्याची जोरदार टीका होत असल्याचं पाहून सुरेखा यांनी दोघांच्या कुटुंबीयांची माफी मागितली आहे. पण, भारत राष्ट्र समितीचे नेते केटी रामा राव (केटीआर) यांच्या विरोधातील आरोप मागं घेण्यास इन्कार केला आहे. केटीआर यांनी माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली आहे. केटीआर यांनी अभिनेत्रींचे फोन टॅप केले. त्यांना ब्लॅकमेल केलं. समांथा आणि नागा चैतन्य यांच्या घटस्फोटाचंही ते कारण आहेत, असा आरोप सुरेखा यांनी केला आहे. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय होता आरोप?

सुरेखा यांनी यापूर्वी समंथा आणि नागा चैतन्य यांच्या घटस्फोटाबाबत धक्कादायक दावा केला होता. 'केटी रामा राव (केटीआर) यांच्यामुळेच समंथाचा घटस्फोट झाला. ते तेंव्हा मंत्री होते आणि अभिनेत्रींचे फोन टॅप करत असतं. त्यानंतर त्यांना ब्लॅकमेल करुन त्यांच्या कमकुवत बाजू शोधत. त्यांना ड्रग्जची सवय लावत. हे सर्वांना माहिती आहे. समंथा, नागा चैतन्य, त्यांचे कुटुंबीय सर्वांना हे माहिती आहे.' असा दावा सुरेखा यांनी केला. त्यानंतर जोरदार खळबळ उडाली होती.

समंथा आणि नागा चैतन्य दोघंही दक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील बडे कलाकार आहेत. नागा चैतन्य हा दिग्गज अभिनेता नागार्जुनाचा मुलगा असून त्याचा अक्किनेनी परिवार तेलुगु फिल्म इंडस्ट्रीमधील पॉवर हाऊस समजला जातो. 

( नक्की वाचा : अभिषेक-ऐश्वर्यामुळे चर्चेत आलेला Grey Divorce प्रकार काय आहे? तो का घेतला जातो? )
 

नागार्जुनानं दिलं उत्तर

नागा चैतन्यचे वडिल आणि दिग्गज अभिनेत्रा नागार्जुन यांनी कोंडा सुरेखा यांच्या आरोपांना उत्तर दिलं आहे. 'मी आदरणीय मंत्री कोंडा सुरेखा यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध करतो. राजकारणापासून दूर राहणाऱ्या चित्रपट कलाकरांच्या आयुष्याचा वापर विरोधकांवर टीका करण्यासाठी करु नका. कृपया अन्य लोकांच्या प्रायव्हसीचाही आदर करा. 

Advertisement

एक जबादार पदावरील महिलेनं आमच्या कुटंबीयांबाबत केलेले वक्तव्य आणि आरोप हे पूर्णपणे अप्रसांगिक आणि निराधार आहेत. तुम्ही तुमचं वक्तव्य तातडीनं मागं घ्यावं अशी मी विनंती करतो,' या शब्दात नागार्जुन यांनी उत्तर दिलं आहे. नागार्जुन प्रमाणेच समंथा आणि नागा चैतन्य यांनीही या आरोपांचा निषेध केला आहे.