Fish Venkat passes away: सिनेसृष्टीवर शोककळा! प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन, लेकीने मदत मागितली पण...

Fish Venkat Death: डॉक्टरांनी त्यांना किडनी प्रत्यारोपण करण्याचा सल्ला दिला होता. तथापि, आर्थिक अडचणींमुळे त्यांच्यावर उपचार करू शकले नाही, यातच त्यांचा मृत्यू झाला. 

जाहिरात
Read Time: 2 mins

Actor Fish Venkat Passes Away: दाक्षिणात्य सिनेसृष्टीला एकाच आठवड्यात दुसरा धक्का बसला आहे. तेलुगू चित्रपटाचे विनोदी कलाकार अभिनेता फिश वेंकट, (वेंकट राज) यांचे 18 जुलै 2025 रोजी निधन झाले. ते  गेल्या अनेक महिन्यांपासून किडनीवर उपचार घेत होते. त्यांच्यावर डायलिसिस सुरू होते आणि अलीकडेच त्यांचे शरीर कमकुवत झाल्यामुळे व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. ते 'गब्बर सिंग' आणि 'डीजे टिल्लू' मधील त्यांच्या अभिनयासाठी ओळखले जात होते. फिश वेंकट त्यांच्या विनोदी भूमिकांसाठी चित्रपटसृष्टीत प्रसिद्ध होते.

Ranya Rao: वडील IPS, स्वत: अभिनेत्री... सोन्याच्या तस्करीत अडकलेली रान्या राव कोण आहे?

ज्येष्ठ अभिनेते आणि विनोदी कलाकार वेंकट राज यांना नुकतेच मूत्रपिंड निकामी झाल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना मूत्रपिंड प्रत्यारोपणाची आवश्यकता होती आणि त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी त्यांना किडनी प्रत्यारोपण करण्याचा सल्ला दिला होता. तथापि, आर्थिक अडचणींमुळे त्यांच्यावर उपचार करू शकले नाही, यातच त्यांचा मृत्यू झाला. 

वेंकट यांची मुलगी श्रवंती मदतीचे आवाहनही केले होते. "वडिलांची तब्येत अजिबात ठीक नाही. त्यांची प्रकृती खूपच गंभीर आहे आणि ते आयसीयूमध्ये आहेत. त्यांना मूत्रपिंड प्रत्यारोपणाची गरज आहे. त्यासाठी किमान ₹50 लाख खर्च येईल, असं तिने सांगितले होते. त्यांना अभिनेता प्रभासच्या टीमने मदत केल्याचेही सांगण्यात आले, मात्र हा फेक कॉल आल्याचे समोर आले. अखेर उपचाराअभावी वेंकट यांची प्राणज्योत मालवली.

Salman Khan Sells Flat: सलमान खानने घर विकलं, 1318 स्क्वेअर फुटांच्या फ्लॅटचा सौदा ऐकून चक्कर येईल

दरम्यान,  व्यंकट हे दाक्षिणात्य सिनेमातील आघाडीचे कलाकार होते. दोन दशकांहून अधिक काळाच्या कारकिर्दीत, ते त्यांच्या विनोदी भूमिका आणि सहाय्यक भूमिकांसाठी ओळखले जात होते आणि अनेकदा तेलंगणा भाषेतील चित्रपटांमध्ये दिसले.

Advertisement

1971 मध्ये आंध्र प्रदेशातील मछलीपट्टनम येथे जन्मलेल्या फिश वेंकट यांनी 2000 मध्ये आलेल्या 'समक्का सरक्का' या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यांनी बहुतेकदा पडद्यावर नकारात्मक भूमिका साकारल्या आणि नंतर प्रेक्षकांना हसवण्यासाठी काही चित्रपटांमध्ये विनोदी कलाकार बनले. 'गब्बर सिंग', 'अधूर', 'डीजे टिल्लू' सारख्या उत्कृष्ट चित्रपटांमधून त्यांनी लोकांमध्ये आपली ओळख निर्माण केली.