
बॉलिवूड अभिनेता सलमान खानने मुंबईतील वांद्रे पश्चिम येथील त्याचे 1,318 चौरस फुटांचे घर विकले आहे. या विक्रीतून त्याला 5.35 कोटी रुपये मिळाले असल्याची माहिती मिळाली आहे. स्क्वेअर यार्ड्स या रिअल इस्टेट सल्लागार कंपनीने ही माहिती दिली आहे. स्क्वेअर यार्ड्सने बुधवारी एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. या निवेदनात त्यांनी म्हटलंय की की, त्यांनी सलमान खानने केलेल्या व्यवहारासाठीच्या कागदपत्रांची पडताळणी केली असून ही कागदपत्रे याच महिन्यात रजिस्तर करण्यात आलेली आहेत. सलमान खानने विकलेला हा फ्लॅट वांद्रे पश्चिमेला असलेल्या शिव आस्थान हाईट्समध्ये आहे. याचे बांधकाम क्षेत्र 122.45 चौरस मीटर म्हणजेच सुमारे 1,318 चौरस फूट आहे, असे स्क्वेअर यार्ड्सने दिलेल्या माहितीत म्हटले आहे. कोविड-19 महामारीनंतर मुंबईमध्ये सेलिब्रिटी, क्रिकेटपटू आणि व्यावसायिकांनी अनेक मोठ्या रिअल इस्टेटचे व्यवहार खरेदी-विक्री केले आहेत.
( नक्की वाचा:हिंदी-मराठी भाषा वादावर आशुतोष राणाचे मोठं वक्तव्य, बायको मराठी पण... )
Battle of Galwan मध्ये सलमान-चित्रांगदाची जोडी
सलमान खान हा 'बॅटल ऑफ गलवान' या आगामी चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये गलवान खोऱ्यात रक्तरंजित संघर्ष झाला होता. भारतामध्ये घुसखोरी करून भारताचा भूभाग बळकावण्याचा प्रयत्न भारताच्या बहाद्दर सैनिकांना हाणून पाडला होता. या चित्रपटामध्ये सलमान खानची नायिका म्हणून चित्रांगदा सिंगची निवड करण्यात आली आहे. 'हजारों ख्वाईशें ऐसी', 'ये साली जिंदगी' आणि 'देसी बॉईज' सारख्या चित्रपटांमध्ये चित्रांगदाने केलेलं काम चित्रपटप्रेमींच्या लक्षात राहणारं ठरलं आहे.
( नक्की वाचा: 49 वर्षीय अभिनेत्री सलमान खानची हीरोइन, अक्षय कुमार आणि संजय दत्तसोबतही केलंय काम )
सलमानने वचन पूर्ण केलं
सलमान खानसोबत काम करण्याची संधी मिळाल्याने चित्रांगदा खूश आहे. तिने म्हटलंय की काही वर्षांपूर्वी एका मराठी चित्रपटामध्ये तिला सलमान खानसोबत काम करण्याची संधी मिळाली होती, मात्र काही कारणांमुळे ते शक्य झाले नव्हतं. त्यावेळी त्याने ही संधी पुन्हा येईल असे तिला सांगितले होते. तो किस्सा आठवत चित्रांगदाने सलमान खानचाच डायलॉग "एक बार जो मैंने कमिटमेंट कर ली तो मैं अपने आप की भी नही सुनता" म्हणून दाखवला. सलमानने मला दिलेले वचन पूर्ण केल्याचे तिने म्हटले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world