दाक्षिणात्य सिनेसृष्टीला आठवडाभरात दोन धक्के बसले आहेत. प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री पवित्रा जयरामच्या मृत्यूनंतर आठवडाभरात अभिनेता चंद्रकांतने टोकाचा निर्णय घेतला आहे. चंद्रकांतने शुक्रवारी अकलापूर येथील राहत्या घरी आत्महत्या केली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
चंद्रकांतच्या मृत्यूनंतर त्याच्या वडिलांनी सांगितलं की, मागील काही दिवसांपासून तो तणावात होता. चंद्रकांत आणि पवित्रा जयराम यांच्यात घट्ट मैत्री होती. त्यामुळेच पवित्राच्या मृत्यूचा चंद्रकांतला मानसिक धक्का बसला होता. सोशल मीडियावर देखील चंद्रकांत पवित्राच्या मृत्यूनंतर पोस्ट करत होता. पवित्रासोबतचे त्याचे अनुभव तो शेअर करत होता.
(नक्की वाचा : दारूच्या नशेत आईला केली शिवीगाळ, मित्रांचा झाला संताप; अन्...)
तीन दिवसांपूर्वीच चंद्रकांतने एक पोस्ट केली होती. त्यात त्याने लिहिलं होतं की, "फक्त दोन दिवस वाट बघ." आणखी एका पोस्टमध्ये त्याने लिहिलं होतं की, ''गुड मॉर्निंग नाना. जीममध्ये जाण्याची वेळ झाली आहे. आपल्या कोचचा फोन आला होता. लव्ह यू." चंद्रकांतच्या अशो पोस्ट्सनंतर त्याच्या फॅन्सने देखील चिंता व्यक्त केली होती.
(नक्की वाचा: मुंबईतील बड्या उद्योजकाला पोलिसानेच घातला 25 लाखांचा गंडा, काय आहे प्रकरण?)
पवित्राचं अपघातात निधन
अभिनेत्री पवित्रा जयरामचं 12 मे रोजी आंध्र प्रदेशच्या महबूब नगर येथे भीषण कार अपघातात निधन झालं होतं. पवित्रा तेलुगू टेलिव्हिजन सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री होती. त्रिनयानी या प्रसिद्ध सीरिअलमध्ये तिने तिलोत्तमाची भूमिका साकारली होती.