जाहिरात

मुंबईतील बड्या उद्योजकाला पोलिसानेच घातला 25 लाखांचा गंडा, काय आहे प्रकरण?

मुंबईतील माटुंगा परिसरातील हॉटेल 'कॅफे मैसूर'च्या मालकाला सहा भामट्यांनी 25 लाख रुपयांचा गंडा घातला आहे.

मुंबईतील बड्या उद्योजकाला पोलिसानेच घातला 25 लाखांचा गंडा, काय आहे प्रकरण?
प्रतिकात्मक फोटो (Photo Credit - Canva)

Mumbai Mysore Cafe News: मुंबईतील माटुंगा परिसरातील महेश्वरी उद्यानाजवळील हॉटेल 'कॅफे मैसूर'च्या मालकाला सहा भामट्यांनी 25 लाख रुपयांचा गंडा घातला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या टोळीने मुंबई गुन्हे शाखेचे पोलीस असल्याचे सांगत व्यावसायिक नरेश नायक यांना लुटले. काळा पैसा घरामध्ये लपवल्याचा आरोप करत या सहा जणांनी नरेश नायक यांच्या घरावर धाड मारल्याचे नाटक केले आणि 25 लाख रुपये उकळले. या प्रकरणी नरेश नायक यांनी सायन पोलीस ठाण्यामध्ये दाखल केलेल्या तक्रारीनुसार सहा अज्ञातांविरोधात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही खळबळजनक घटना मंगळवारी (14 मे 2024) उघडकीस आली. 

(नक्की वाचा: कर्ज फेडण्यासाठी नातवाने उचलले टोकाचे पाऊल, 80 वर्षीय आजीविरोधात रचला गंभीर कट)

गुन्ह्यामध्ये पोलिसाचाही सहभाग

या प्रकरणाचा तातडीने तपास करत पोलिसांनी या टोळीला गजाआड केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीषा शिर्के यांनी दिली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या गुन्ह्यामध्ये पोलीस कर्मचारी बाबासाहेब भागवत (वय 50 वर्ष) व निवृत्त पोलीस कर्मचारी दिनकर साळवे (वय 60 वर्ष) यांचाही सहभाग होता.  इतकेच नव्हे तर या टोळीने पोलिसांच्या वाहनाचाही वापर केल्याचे म्हटले जात आहे.   

(नक्की वाचा: बाप लेकीच्या नात्याला डाग, तेरा वर्षीय लेकीवर बापानेच टाकला हात)

व्यावसायिकाची अशी केली लूट

व्यावसायिकाचा आपल्यावर विश्वास बसावा, म्हणून टोळीने स्वत:चे बनावट ओळखपत्रही तयार केले होते. सोमवारी (13 मे 2024) दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास ही टोळी नरेश नायक यांच्या सायनमधील घरी पोहोचले. काही मिनिटे नरेश यांना धाक दाखवून आरोपी घरातील 25 लाख रुपयांची रक्कम घेऊन पसार झाले. तसेच घडल्या प्रकाराबाबत कोणालाही काहीही न सांगण्याची धमकीही नरेश यांना दिली. घडल्या प्रकाराबाबत व्यावसायिकाने परिचयाच्या पोलिसांशी चर्चा केल्यानंतर फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.

(नक्की वाचा: दारूसाठी पैसे दिले नाही म्हणून बायकोची हत्या; आरोपी पती फरार)

आरोपींनी व्यवसायिकाला धमकावले

सागर रेडेकर (वय 42 वर्ष), वसंत नाईक (वय 52 वर्ष), शाम गायकवाड (वय 52 वर्ष), नीरज खंडागळे अशी अन्य आरोपींची नाव आहेत. यापैकी वसंत नाईक हा कॅफे मैसूर हॉटेलचा माजी व्यवस्थापक आहे. या टोळीने मुंबई पोलीस असल्याचे ओळखपत्र दाखवले तसेच निवडणूक ड्युटीवर असल्याची बतावणी केली. इतकेच नव्हे तर नरेश नायक यांच्या घरामध्ये निवडणुकीसाठी लागणारी 17 कोटी रुपये असल्याची माहिती मिळाल्याचे सांगत त्यांच्या घराची झाडझडतीही घेतली. यावेळेस त्यांच्या कपाटामध्ये 25 लाख रुपयांची रोकड सापडली. ही रक्कम हॉटेल व्यवसायातील असल्याचे नरेश यांनी सांगितले. तरीही गुन्हा दाखल करण्याची धमकी देत प्रकरण मिटवण्यासाठी आरोपींनी 2 कोटी रुपयांची मागणी नायक यांच्याकडे केली. 

नरेश यांनी इतकी रक्कम नसल्याचे सांगताच या टोळीने 25 लाख रुपयांची रोकड घेऊन पोबारा केला. दरम्यान तक्रारीनंतर पोलीस पथक आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळ गाठले व घरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणी ताब्यात घेतले.  

VIDEO: राऊतांच्या आरोपानंतर नाशिकमध्ये CM शिंदेंच्या बॅगची पोलिसांकडून तपासणी

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: