Kota Srinivasa Rao Death: सिनेसृष्टीवर शोककळा! 750 सिनेमे करणाऱ्या दिग्गज खलनायकाचे निधन

Telugu Actor Kota Srinivasa Rao Passes away: दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सर्वात खतरनाक खलनायक म्हणून त्यांचे नाव घेतलं जाते. त्यांच्या निधनाने फक्त तेलुगूच नव्हेतर संपूर्ण सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

Kota Srinivasa Rao Passes away: तेलुगू चित्रपटसृष्टीतून एक दुःखद बातमी आली आहे. तेलुगू सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते कोटा श्रीनिवास राव (Kota Srinivass Rao) यांचे रविवारी पहाटे 4 वाजता हैदराबाद येथील त्यांच्या राहत्या घरी दीर्घ आजाराने निधन झाले. वयाच्या 83 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी ट्वीट करत शोक व्यक्त केला आहे. दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सर्वात खतरनाक खलनायक म्हणून त्यांचे नाव घेतलं जाते. त्यांच्या निधनाने फक्त तेलुगूच नव्हेतर संपूर्ण सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. 

TV Actress: मिरचीचा स्प्रे, नंतर चाकूहल्ला... 'त्या' संशयातून अभिनेत्रीवर पतीचा हल्ला

दिग्गज खलनायकाचे निधन

दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकारांपैकी एक असलेले अभिनेते कोटा श्रीनिवास राव यांचे दुःखद निधन झाले आहे.  आपल्या उत्कृष्ट अभिनयाने अनेक दशके प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सर्वात खतरनाक खलनायक अशी त्यांची ओळख होती. अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम करत त्यांनी सिनेसृष्टी गाजवली. ते आंध्रप्रदेशच्या राजकारणात विजयवाडा विधानसभेचे माजी आमदारही होते.  

Advertisement

मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू (Chandrababu Naidu) यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवरून अभिनेते कोटा श्रीनिवास यांच्या निधनाबद्दल ट्विट केले आहे. त्यांनी लिहिले आहे की, 'आपल्या बहुमुखी भूमिकांनी चित्रपट प्रेक्षकांची मने जिंकणारे प्रसिद्ध अभिनेते कोटा श्रीनिवास राव यांचे निधन अत्यंत दुःखद आहे. त्यांचे कलात्मक योगदान आणि जवळजवळ चार दशकांपासून चित्रपट आणि नाट्य क्षेत्रात त्यांनी साकारलेल्या भूमिका अविस्मरणीय राहतील. खलनायक आणि पात्र कलाकार म्हणून त्यांनी साकारलेल्या असंख्य संस्मरणीय भूमिका तेलुगू प्रेक्षकांच्या हृदयात कायमच्या कोरल्या जातील.  1999 मध्ये, त्यांनी विजयवाडा येथून आमदार म्हणून विजय मिळवला आणि जनतेची सेवा केली. मी त्यांच्या कुटुंबियांना माझ्या मनापासून संवेदना व्यक्त करतो.'

Advertisement

दरम्यान, कोटा श्रीनिवास हे त्यांच्या खलनायकी (Telugu Cinema Villain) भूमिकांसाठी ओळखले जातात आणि त्यांनी 750 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांनी 1978 मध्ये 'प्रणम खरेदू' या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. 1990 च्या दशकात ते भाजपमध्ये सामील झाले आणि 1999 मध्ये विजयवाडा पूर्वेतून आंध्र प्रदेश विधानसभेवर निवडून आले.

Advertisement