Mumbai Crime: शरीर संबंधांस नकार दिल्याच्या रागातून अभिनेत्याने मोलकरणीचा खून केल्याची भयंकर घटना ठाण्यातील मिरा रोड परिसरात घडली आहे. याप्रकरणी आरोपी टीव्ही अभिनेता आशिष मेश्राम याला मीरा रोड पोलिसांनी शुक्रवारी विशाखापट्टणम येथून अटक केली आहे. मेश्राम हा टीव्ही अभिनेता असून काही नावाजलेल्या मालिकांमध्ये त्याने काम केलं आहे. या भयंकर प्रकरणाने सिनेसृष्टीत खळबळ उडाली आहे.
Tehsildar Amrita Singh Tomar: KBC मध्ये 50 लाख जिंकणाऱ्या महिला तहसीलदाराला अटक; काय आहे प्रकरण?
मोलकरणीची हत्या, अभिनेत्याचे क्रुर कृत्य
याबाबत सविस्तर वृत्त असे की, मीरा रोड परिसरात एक थरकाप उडवणारी घटना समोर आली असून, एका ३६ वर्षीय घरकाम करणाऱ्या महिलेची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली आहे. सुमन कांबळे असे मृत महिलेचे नाव असून, त्या काशीमीरा परिसरात आपल्या पती आणि चार मुलांसह राहत होत्या. याप्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून आरोपीच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत.
मीरा रोड पूर्वेकडील साईबाबा नगर येथील 'चंद्रेश एकॉर्ड्स' या इमारतीतील एका फ्लॅटमध्ये ही घटना घडली. या फ्लॅटमध्ये दोन भाऊ राहत होते. आरोपी असलेला ४२ वर्षीय तरुण हा चित्रपट सृष्टीत छोटे-मोठे काम करणारा (स्मॉल टाईम) अभिनेता आहे. तो गेल्या महिन्याभरापासून सुमन यांच्यावर शारीरिक संबंधांसाठी दबाव टाकत होता. सुमन यांनी याला कडाडून विरोध केला होता आणि ही बाब आपल्या कुटुंबीयांना तसेच आरोपीच्या मोठ्या भावालाही सांगितली होती. तक्रार केल्यानंतर त्यांनी तिथे कामावर जाणे बंद केले होते.
Salman Khan : सलमान खानला अटक होणार? 'केशर' प्रकरणावरुन न्यायालयाचे पोलिसांना आदेश
मात्र, आरोपीच्या मोठ्या भावाने सुमन यांना पुन्हा कामावर येण्याची विनंती केली आणि खात्री दिली की आरोपी आता घरी राहत नाही. या विश्वासावर बुधवारी संध्याकाळी सुमन कामावर गेल्या असता, तिथे दबा धरून बसलेल्या आरोपीने त्यांच्यावर चाकूने सपासप वार केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सुमन यांनी मदतीसाठी दरवाजापर्यंत येण्याचा प्रयत्न केला, मात्र जखमा गंभीर असल्याने त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. प्राथमिक तपासात मोठ्या भावाचा या कटात सहभाग नसल्याचे दिसून आले असले, तरी पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world