जाहिरात

The Bengal Files : हिंदूंचा नरसंहार पडद्यावर दिसणार! 'द बंगाल फाईल्स' चा अंगावर काटा आणणारा ट्रेलर पाहा Video

The Bengal Files Trailer :  दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री त्यांच्या चित्रपटांमुळे नेहमीच चर्चेत असतात. 'द कश्मीर फाइल्स' नंतर आता त्यांच्या नव्या चित्रपट 'द बंगाल फाइल्स' चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

The Bengal Files : हिंदूंचा नरसंहार पडद्यावर दिसणार! 'द बंगाल फाईल्स' चा अंगावर काटा आणणारा ट्रेलर पाहा Video
The Bengal Files Trailer : द बंगाल फाईल्स ट्रेलर लॉन्च कार्यक्रमात अडथळा निर्माण करण्यात आला होता.
मुंबई:

The Bengal Files Trailer :  दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री त्यांच्या चित्रपटांमुळे नेहमीच चर्चेत असतात. 'द कश्मीर फाइल्स' नंतर आता त्यांच्या नव्या चित्रपट 'द बंगाल फाइल्स' चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. या चित्रपटाची कथा बंगालच्या फाळणीशी संबंधित शोकांतिकेवर आधारित आहे, ज्यात हिंदूंच्या नरसंहाराला मोठ्या पडद्यावर दाखवण्यात आले आहे.

या चित्रपटामध्ये ज्येष्ठ अभिनेते  अनुपम खेर यांनी महात्मा गांधींची भूमिका साकारली आहे. जी सर्वांची लक्ष वेधून घेत आहे. त्याचबरोबर मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी आणि दर्शन कुमार यांसारखे कलाकार आपापल्या भूमिकेत खूप प्रभावी दिसत आहेत. याशिवाय, 'अनुपमा' या टीव्ही शोमधून प्रसिद्ध झालेल्या मदालसा शर्मा आणि 'गदर 2' फेम सिमरत कौर देखील यात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

ट्रेलर लॉन्चमध्ये अडथळा

या चित्रपटाच्या  ट्रेलर लॉन्चचा कार्यक्रम 16 ऑगस्ट रोजी कोलकाता येथे आयोजित करण्यात आला होता. मात्र, या कार्यक्रमात तणाव निर्माण झाला होता. याबाबत मिळालेल्या वृत्तांनुसार, कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच काही आंदोलकांनी गोंधळ घातला आणि त्यामुळे एकच गोंधळ उडाला. ट्रेलर लॉन्च थांबवण्यासाठी हॉटेलमधील वीजपुरवठाही खंडित करण्यात आला. विवेक अग्निहोत्रींनी या घटनेला थेट "हुकूमशाही" म्हटले आणि त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, "ट्रेलर कोलकातामध्येच लॉन्च होईल आणि कोणीही आम्हाला रोखू शकत नाही."

( नक्की वाचा : KBC 17: 'ऑपरेशन सिंदूर' ची गरज का होती? कर्नल सोफिया कुरेशी यांनी अमिताभ बच्चन यांना सांगितलं कारण, पाहा Video )

ट्रेलरमध्ये काय आहे?

ट्रेलरच्या सुरुवातीला असे दाखवण्यात आले आहे की, बंगालमध्ये दोन कायदे लागू होते. एक हिंदूंसाठी आणि दुसरा मुस्लिमांसाठी. हा चित्रपट महात्मा गांधी आणि मोहम्मद अली जिन्ना यांच्यातील वादविवादाची झलक देखील या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलीय. रक्तपात, धर्माच्या नावावर झालेले युद्ध आणि हजारो निष्पापांच्या मृत्यूला पडद्यावर आणण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या चित्रपटाची निर्मिती अभिषेक अग्रवाल, पल्लवी जोशी आणि विवेक रंजन अग्निहोत्री यांनी केली आहे. 'द बंगाल फाइल्स' 6 सप्टेंबर 2025 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईल. या चित्रपटामुळे पुन्हा एकदा देशात वाद आणि चर्चा सुरु होणार असल्याचा अंदाज ट्रेलरवरुन लावता येईल.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com