
Kaun Banega Crorepati 17: कौन बनेगा करोडपती'च्या 17व्या (Kaun Banega Crorepati Season 17) सिझला दमदार सुरुवात झाली आहे. सोमवार, 11 ऑगस्ट रोजी या कार्यक्रमाचा पहिला भाग प्रदर्शित झाला. आता केबीसीमध्ये स्वातंत्र्यदिनानिमित्त विशेष भाग प्रदर्शित होणार आहे. ज्यात भारतीय सशस्त्र दलांमधील प्रतिष्ठित अधिकारी सहभागी होणार आहेत. या अधिकाऱ्यांनी ऑपरेशन सिंदूरच्या पत्रकार परिषदांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती.
सोनी टीव्हीने प्रसिद्ध केलेल्या प्रोमोमध्ये, होस्ट अमिताभ बच्चन यांनी भारतीय लष्कराच्या कर्नल सोफिया कुरेशी, भारतीय वायुसेनेच्या विंग कमांडर व्योमिका सिंग आणि भारतीय नौदलाच्या कमांडर प्रेरणा देवस्थळी यांचे शोमध्ये स्वागत करताना दिसत आहेत.
15 ऑगस्ट रोजी रात्री 9 वाजता प्रसारित होणाऱ्या या विशेष भागात, अधिकाऱ्यांनी ऑपरेशन सिंदूरबद्दल माहिती दिली. 22 एप्रिलच्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून 7 मे रोजी पहाटे भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तानमधील 9 दहशतवादी छावण्यांवर हे लक्ष्यित हल्ले केले होते.
( नक्की वाचा : Kaun Banega Crorepati 17: या प्रश्नामुळे सोडावे लागले 50 लाखांवर पाणी, तुम्ही देऊ शकला असता झटकन उत्तर )
कर्नल सोफिया कुरेशी यांनी पाकिस्तानविरुद्ध ऑपरेशन सिंदूर सुरू करण्याची वेळ का आली, याचं उत्तर दिलं आहे.
त्या म्हणाल्या, "पाकिस्तान हे अनेक वर्षांपासून करत आहे. त्यामुळे त्यांना उत्तर देणे महत्त्वाचे होते, सर. म्हणूनच ऑपरेशन सिंदूरची योजना आखण्यात आली."
( नक्की वाचा : Independence Day Speech: स्वातंत्र्यदिनी शाळेत भाषण करण्यासाठी लक्षात ठेवा 10 मुद्दे, सर्व करतील तुमचं कौतुक )
त्यावर, विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी पुढे सांगितले की, "रात्री 1 वाजून 5 मिनिटांपासून ते 1.30 वाजेपर्यंत, 25 मिनिटांत त्यांचा खेळ संपवला."
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world