बॉलीवूडमध्ये असे अनेक स्टार्स आहेत ज्यांना त्यांच्या लहानपणीच्या फोटोवरून ओळखणे कठीण होते. अशीच ही अभिनेत्री आहे, जिचा लहानपणीचा फोटो पाहून तिला ओळखणे तुमच्यासाठी कठीण जाईल. हा फोटो पाहा, तुम्ही या बॉलीवूड अभिनेत्रीला ओळखू शकलात का? नाही ना? पण या अभिनेत्रीने बॉलीवूड सुपरस्टार सलमान खानसोबत काम केले आहे. त्याचबरोबर, या अभिनेत्रीने काही चित्रपटांमध्ये बोल्ड सीन देऊन पडद्यावर आग लावली होती. 38 वर्षांची ही अभिनेत्री 'बिग बॉस'मध्ये आलेल्या एका श्रीमंत कॉमनर स्पर्धकाला डेट करत आहे. अनेक बॉलीवूड चित्रपटांमध्ये तिने काम केले आहे. जर तुम्हाला अजूनही ही अभिनेत्री ओळखता आली नाही, तर आम्ही तुम्हाला सांगतो ही अभिनेत्री कोण आहे. तिची तुलना कॅटरीना कैफ बरोबर होत होती.
नक्की वाचा - प्रसिद्ध अभिनेत्रीचा भीक मागतानाचा Video Viral, डफली वाजवत गायलं सलमानचं गाणं
ओळखा कोण आहे ही मुलगी?
फोटोत दिसणारी ही मुलगी दुसरी कोणी नसून, सलमान खानच्या 'वीर' (2010) या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री जरीन खान आहे. झाली ना तुमची फसगत? लहानपणीच्या फोटोवरून या अभिनेत्रीला ओळखणे कोणासाठीही सोपे नाही. जरीन खानने तिचा लहानपणीचा हा फोटो 19 एप्रिल 2018 रोजी शेअर केला होता. त्याखाली तिने 'एकदा एक काळ होता, जेव्हा गोड आणि निरागस होती आणि काहीतरी घडले' असे कॅप्शन लिहिले होते. जरीनच्या या फोटोला आतापर्यंत 1 लाख 90 हजारांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत. अनेक चाहत्यांनी सुंदर कमेंट्सही पोस्ट केल्या आहेत. हा फोटो जरीनने थ्रोबॅक थर्सडे सेक्शनमध्ये शेअर केला होता.
जरीनचा फिल्मी प्रवास
जरीन खानच्या फिल्मी प्रवासाबद्दल बोलायचे झाल्यास, पदार्पणानंतर ती सलमानसोबत 'रेडी' चित्रपटातही दिसली होती. यानंतर ती 'हाऊसफुल 2', 'हेट स्टोरी 3', 'वजह तुम हो', 'अक्सर 2', '1921', 'चाणक्य', 'डाका' आणि 'हम भी अकेले तुम भी अकेले' यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसली आहे. 2021 नंतर जरीन खानला कोणत्याही चित्रपटात पाहिले गेले नाही. ती शेवटची 2022 मध्ये 'ईद हो जाएगी' या म्युझिक व्हिडिओमध्ये दिसली होती. सध्या जरीन खान सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. रोज आपले नवीन-नवीन फोटो शेअर करत असते. जरीन खान 'बिग बॉस 12' चा स्पर्धक, मॉडेल आणि व्यापारी शिवाशीष मिश्रासोबत बऱ्याच काळापासून रिलेशनशिपमध्ये आहे.