Stranger Things Season 5 Budget News: नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मची (Netflix) जगभरात लोकप्रिय असलेली वेबसिरीज 'स्ट्रेंजर थिंग्ज' (Stranger Things Season 5) चा पाचवा आणि अंतिम सीझन यावर्षी प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. मात्र, प्रदर्शनापूर्वीच हा सीझन त्याच्या अवाढव्य बजेटमुळे चर्चेत आला आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार, 'स्ट्रेंजर थिंग्ज सीझन ५'चा बजेट टीव्हीच्या इतिहासातील सर्वाधिक असणार आहे.
माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, सीझन ५ च्या प्रत्येक एपिसोडसाठी 50 ते 60 दशलक्ष (म्हणजेच सुमारे 443 ते 532 कोटी) खर्च करण्यात आला आहे. बजेटच्या बाबतीत ही वेबसिरीज आतापर्यंतची सर्वात महागडी वेब सीरिज मानल्या जाणाऱ्या 'द लॉर्ड ऑफ द रिंग्स: द रिंग्स ऑफ पॉवर' च्या जवळपास पोहोचली आहे, ज्याचा प्रति एपिसोड खर्च USD 58 दशलक्ष होता. संपूर्ण पाचव्या सीझनचे बजेट सुमारे 480 दशलक्ष (सुमारे Rs 4,261 कोटी) असल्याचा अंदाज आहे.
मागील, सीझन ४ चा प्रति एपिसोडचा बजेट 30 दशलक्ष ( 266 कोटी) होता, परंतु अंतिम सीझनचा हा बजेट त्यापेक्षा अनेक पटीने मोठा आहे. 'स्ट्रेंजर थिंग्ज सीझन ५' एकूण आठ एपिसोड्सचा असणार आहे आणि हा सीझन यावर्षी तीन भागांमध्ये प्रदर्शित केला जाईल. ज्याचे पहिले चार एपिसोड २६ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होतील.
पुढील तीन एपिसोड २५ डिसेंबर (नाताळ) रोजी प्रदर्शित होतील. अंतिम एपिसोड ३१ डिसेंबर रोजी प्रदर्शित होईल. या सीझनचा प्रत्येक एपिसोड ९० मिनिटे ते दोन तासांपर्यंत असणार आहे. त्यामुळे, वेब सीरिजपेक्षा हा सीझन एखाद्या भव्य चित्रपटासारखा अनुभव देणार आहे. आता या धमाकेदार वेबसिरीजची प्रेक्षकांना चांगलीच उत्सुकता लागली आहे.