'आज कुछ तूफानी करते है...'; हनुमानकाइण्ड आणि विशाल ददलानीच्या आवाजात नवीन गाणं लाँच

थम्स अपचे क्रिकेटशी असलेले जुने नाते या गाण्यातूनही दिसून येते. या गाण्यामध्ये भारताचे स्टार क्रिकेटर्स सूर्यकुमार यादव आणि रिंकू सिंह हे देखील झळकत आहेत. यामुळे आगामी आयसीसी मेन्स टी20 वर्ल्ड कपसाठी चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

भारतातील कोल्ड्रिंक ब्रँड थम्स अप (Thums Up) ने आपल्या प्रसिद्ध 'आज कुछ तूफानी करते हैं' या मोहिमेला एका नवीन उंचीवर नेले आहे. जागतिक स्तरावर गाजलेला रॅपर हनुमान काइण्ड (Hanumankind) आणि बॉलिवूडचा रॉकस्टार विशाल ददलानी यांच्या अनोख्या जुगलबंदीतून 'टेस्ट द थंडर' हे नवीन गाणे लाँच करण्यात आले आहे. मुंबईत आयोजित एका विशेष प्रेस आणि क्रिएटर शोकेसमध्ये हे गाणे लाँच करण्यात आले. आधुनिक हिप-हॉप आणि रॉक शैलीचा मिलाफ असलेले हे गाणे तरुणांना भुरळ घालत आहे. 

दिग्गज कलाकारांची मांदियाळी

या गाण्याच्या निर्मितीसाठी भारतीय संगीतातील आघाडीची नावे एकत्र आली आहेत. रॅपर हनुमानकाइण्डने इंग्रजी रॅपमधून गाणं  मांडलं आहे, तर विशाल ददलानीने आपल्या रॉक शैलीतून या गाण्यात जीव ओतला आहे. सुशीन श्याम यांनी हे गाणे संगीतबद्ध केले असून, प्रसिद्ध लेखक वरुण ग्रोव्हर यांनी हिंदी गीताची रचना केली आहे. बिजॉय शेट्टीने या गाण्याचे चित्रीकरण केले आहे.

Advertisement

क्रिकेटचा तडका

थम्स अपचे क्रिकेटशी असलेले जुने नाते या गाण्यातूनही दिसून येते. या गाण्यामध्ये भारताचे स्टार क्रिकेटर्स सूर्यकुमार यादव आणि रिंकू सिंह हे देखील झळकत आहेत. यामुळे आगामी आयसीसी मेन्स टी20 वर्ल्ड कपसाठी चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

विशाल ददलानी याबद्दल म्हटलं की, ''आमचे संगीत विश्व खूप वेगळे आहे. आम्‍ही या वेगळेपणाला कमी करण्‍याचा किंवा एकत्र आणण्‍याचा प्रयत्‍न केला नाही, तर त्‍या वेगळेपणामधून उत्‍साह जागृत होईल आणि काहीतरी तूफानी निर्माण होईल, याची खात्री घेतली. यामधून खरा रोमांच प्रत्‍यक्षात आला आणि गाण्‍याला नवीन ओळख मिळाली.''   हनुमानकाइण्‍डने म्‍हटलं की, "या गाण्‍यासाठी प्रतिभावान आर्टिस्‍ट्स एकत्र आले आणि आता आम्‍ही तुमच्‍यासाठी हे गाणे सादर केले आहे.''

पाहा VIDEO 

Topics mentioned in this article