जाहिरात
Story ProgressBack

'या' नायिकने केलंय 12 वी मध्ये टॉप, IAS ऑफिसर होता-होता झाली हिरोईन!

अभ्यासात हुशार असल्यानं सरकारी अधिकारी होण्याचं तिचं स्वप्न होतं. यूपीएससीची परीक्षा देण्याचाही तिनं निश्चय केला होता. पण तिच्या आयुष्यानं वेगळंच वळण घेतलं आणि ती अभिनेत्री झाली. 

Read Time: 2 min
'या' नायिकने केलंय 12 वी मध्ये टॉप, IAS ऑफिसर होता-होता झाली हिरोईन!
मुंबई:

साऊथ इंडियन सिनेमा गाजवल्यानंतर राशी खन्नानं आता बॉलिवूडमध्येही जागा मिळवलीय. बरेच कष्ट केल्यानंतर इंडस्ट्रीमध्ये राशीनं स्वत:ची जागा निर्माण केलीय. तिनं हैदराबादमध्ये नुकतचं एक पॉश घर खरेदी केलंय. त्याच्या गृहप्रवेशाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होती. राशी खन्नाला आयएएस (IAS) ऑफिसर व्हायचं होतं हे तुम्हाला माहिती आहे का? पण, तिच्या नशिबात काही तरी वेगळंच होतं त्यामुळे ती नायिका बनली.   

राशिच्या अभिनयाबद्दल सर्वांनाच माहिती आहे. पण, ती अभ्यासातही हुशार होती हे खूप कमी लोकांना माहिती आहे. तिला अभ्यास करायला खूप आवडत असे. इतकंच नाही तर तिनं 12 वी मध्ये वर्गात टॉप केलं होतं. अभ्यासात हुशार असल्यानं सरकारी अधिकारी होण्याचं तिचं स्वप्न होतं. यूपीएससीची परीक्षा देण्याचाही तिनं निश्चय केला होता. पण तिच्या आयुष्यानं वेगळंच वळण घेतलं आणि ती अभिनेत्री झाली. 

राशी खन्नानं बॉलिवूडमध्ये जॉन अब्राहमच्या सिनेमातून एन्ट्री केली होती. मद्रास कॅफेमध्ये तिनं छोटा रोल केला होता. त्यानंतर तिनं अनेक तामिळ, तेलुगू, मल्याळम चित्रपटात काम केलंय. व्हिलन या मल्याळम चित्रपटातून तिनं सर्वांचं मन जिंकलं. या यशानंतर तिनं मागं वळून पाहिलं नाही. ती यापूर्वी सिद्धार्थ मल्होत्रासोबत योद्धा चित्रपटात दिसली होती. त्यामध्ये दिशा पटनीचीही भूमिका होती. सिद्धार्थ आणि राशीची केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडली होती. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
डार्क मोड/लाइट मोड बदलण्यासाठी
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination