Tusshar Kapoor property deal : बॉलिवूड अभिनेता तुषार कपूर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यंदा चर्चेत येण्यामागील कारण चित्रपट नसून एक प्रॉपर्टी डिल आहे. अभिनेता तुषार कपूरने मुंबई उपनगरातील एक व्यावसायिक इमारत जपानमधील मोठी कंपनी NTT Groupच्या एका भारतीय युनिटला विकली आहे. या महागड्या डिलची किमत पाहून हैराण व्हाल.
रजिस्ट्रेशन डॉक्यूमेंटनुसार, NTT ग्लोबल डेटा सेंटर्स आणि तुषार इन्फ्रा डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेडदरम्यान हा करार झाला. तुषार कपूरच्या या कंपनीत तिचे वडील आणि दिग्गज अभिनेता जितेंद्रची कंपनी पँथियन बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेडची भागीदारी आहे. ही संपत्ती मुंबईतील चांदिवली भागात बालाजी आयटी पार्कमधील आहे आणि याचं रजिस्ट्रेशन ९ जानेवारीला पूर्ण झालं.
किती कोटींमध्ये झाला करार?
या कराराअंतर्गत जपानी कंपनीने तब्बल ३०,१९५ चौरस मीटरमध्ये पसरलेल्या एका भव्य व्यावसायिक जागा विकत घेतली. यामध्ये तळमजला आणि १० मजली डीसी-१० इमारत समाविष्ट आहे. ज्यात डेटा सेंटर आहे. त्याशिवाय एक स्वतंत्र चार मजली डिझेल जनरेटर रचना सामील आहे. ही मालमत्ता सध्या डेटा सेंटरसारख्या उच्च-मागणीच्या पायाभूत सुविधांच्या श्रेणीमध्ये येते, ज्यामुळे तिचे मूल्य आणखी वाढते.
जपानी कंपनीने ही संपत्ती तब्बल ५५९ कोटी रुपयांना विकत घेतली आहे. ज्यामुळे रियल इस्टेट सेक्टरमध्ये खळबळ उडाली आहे. रियल इस्टेटच्या बाजारात ही डील अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. यापूर्वी मे २०२५ मध्ये ८५५ कोटीचा एक मोठा करार झाला होता. जो मुंबईतील व्यावसायिक संपत्तीतील वाढती मागणी दर्शवत आहे.