Ajey - The Untold Story Of A Yogi: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर जीवनावर आधारित आगामी 'अजेय: द अनटोल्ड स्टोरी ऑफ अ योगी' चित्रपट बऱ्याच काळापासून चर्चेत आहे. योगी आदित्यनाथ यांच्या वाढदिवशी चित्रपटाचे पहिले पोस्टर शेअर करून या चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात आली होती. आता चित्रपटाचा टीझर देखील प्रदर्शित झाला आहे.
अभिनेता अनंत विजय या चित्रपटात योगी आदित्यनाथ यांची भूमिका साकारत आहे.'अजेय: द अनटोल्ड स्टोरी ऑफ अ योगी' चित्रपट 1 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये दाखल होईल.
सम्राट सिनेमॅटिक्सच्या निर्मात्या रितू मेंगी म्हणाल्या, 'अजेय'चा टीझर जुन्या व्यवस्थेला आव्हान देणाऱ्या एका शक्तिशाली कथेची एक अद्भुत झलक आहे. आम्ही ती अशा प्रकारे रचली आहे की ती उत्सुकता जागृत करेल आणि प्रेक्षकांच्या मनात भावनांचा पूर आणेल. योगी केवळ एक आध्यात्मिक व्यक्ती नाही तर एक सुधारक आहे. ज्याच्याकडे भ्रष्ट व्यवस्थेत प्रवेश करण्याची आणि ती आतून बदलण्याची शक्ती आहे. टीझरला मिळालेल्या प्रतिसादावरून दिसून येते की प्रेक्षकांना आता एक धाडसी आणि उद्देशपूर्ण कथा हवी आहे."
परेश रावल यांची देखील भूमिका
सिनेनमात अनंत विजय व्यतिरिक्त, परेश रावल, दिनेश लाल यादव, अजय मेंगी, राजेश खट्टर, पवन मल्होत्रा आणि गरिमा विक्रांत सिंह सारखे कलाकार आहेत. रवींद्र गौतम यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे, तर रितू मेंगी या चित्रपटाच्या निर्मात्या आहेत. चित्रपटाची कथा दिलीप बच्चन झा आणि प्रियांक दुबे यांनी लिहिली आहे.