Varun Dhawan: मेट्रोमध्ये स्टंटबाजी वरूण धवनला पडली महागात! मुंबई मेट्रोचा कडक इशारा

Varun Dhawan Video : वरूणचा हा व्हिडिओ समोर येताच मुंबई मेट्रो ऑपरेशन्स कॉर्पोरेशनने सोशल मीडियावर त्याला जाहीर समज दिली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

'बॉर्डर 2' चित्रपटाच्या यशाचा आनंद साजरा करत असतानाच, अभिनेता वरूण धवन एका वेगळ्याच कारणाने वादात सापडला आहे. मुंबईच्या ट्रॅफिकपासून वाचण्यासाठी मेट्रोने प्रवास करणाऱ्या वरूणने चक्क धावत्या मेट्रोच्या डब्यात 'पुल-अप्स' (व्यायाम) केल्याचा व्हिडिओ शेअर केला. या स्टंटवर मुंबई मेट्रो प्रशासनाने (MMMOCL) कडक शब्दांत आक्षेप घेत वरूणला कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे.

मुंबई मेट्रोची (MMMOCL) कडक प्रतिक्रिया

वरूणचा हा व्हिडिओ समोर येताच मुंबई मेट्रो ऑपरेशन्स कॉर्पोरेशनने सोशल मीडियावर त्याला जाहीर समज दिली आहे. मेट्रो प्रशासनाने म्हटले आहे की, "तुमच्या चित्रपटांप्रमाणे या व्हिडिओसोबतही डिस्क्लेमर असायला हवा होता. महा मुंबई मेट्रोमध्ये असे स्टंट करण्याचा प्रयत्न करू नका."

पाहा VIDEO

(नक्की वाचा-  Border 2 Box Office Collection: 'सनी देओल'ची मुख्य भूमिका असलेला 'बॉर्डर 2' हिट झाला का फ्लॉप ?)

ग्रॅब हँडल फक्त पकडण्यासाठी 

मेट्रोमधील दांडे प्रवाशांना पकडण्यासाठी आहेत, त्यावर लटकून व्यायाम करण्यासाठी नाहीत. हे कृत्य 'मेट्रो रेल्वे (ऑपरेशन आणि मेंटेनन्स) ॲक्ट, 2002' नुसार मालमत्तेचे नुकसान आणि सार्वजनिक शांततेचा भंग करण्याच्या कलमांखाली दंडनीय अपराध आहे. यासाठी जुर्माना किंवा तुरुंगवास दोन्ही होऊ शकतो.

मित्रांसोबत मेट्रोने फिरणे चांगले आहे, पण तिथे लटकू नका. जबाबदार नागरिक म्हणून प्रवास करा," असे आवाहन मेट्रोने वरूण धवनसह सर्व प्रवाशांना केले आहे. यावर आता वरूण धवन काय प्रतिक्रिया देतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
 

Advertisement
Topics mentioned in this article