Tiku Talsania Health Update : ज्येष्ठ अभिनेते टिकू तलसानिया (Tiku Talsania) त्यांच्या अफलातून कॉमेडी अभिनयासाठी ओळखले जातात. 'अंदाज अपना-अपना', 'ढोल', 'स्पेशल 26', 'देवदास' यासारख्या सिनेमांमध्ये त्यांनी अप्रतिम काम केले आहे. दरम्यान कथित स्वरुपात टिकू यांना हृदयाविकाराचा झटका आल्याची माहिती समोर आली. पण NDTVने टिकू तलसानिया (Tiku Talsania Brain Stroke) यांच्या कुटुंबीयांशी बातचित केली त्यावेळेस त्यांना हार्ट अटॅक नव्हे तर ब्रेन स्ट्रोक आल्याची माहिती समजली. शुक्रवारी (10 जानेवारी) ते सिनेमाच्या स्क्रीनिंगसाठी गेले होते, त्यावेळेस ही घटना घडली. यानंतर टिकू यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
टिकू तलसानिया यांची अभिनय क्षेत्रातील कारर्कीद
टिकू तलसानिया यांनी छोट्या पडद्यावरील कित्येक मालिका तसेच बॉलिवूड सिनेमांमध्ये काम केले आहे. टिकू यांनी 1984मध्ये टेलिव्हिजन मालिका 'ये जो है जिंदगी'च्या माध्यमातून आपल्या अभिनय कारर्कीदीची सुरुवात केली. 1986नंतर त्यांना 'प्यार के दो पल', 'ड्युटी' आणि 'असली नकली' या तीन हिंदी सिनेमांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. यानंतर 'कई गोलमाल है भाई सब गोलमाल है', 'बोल राधा बोल', 'कुली नंबर 1', 'राजा हिंदुस्तानी', 'हीरो नंबर '1, 'बड़े मियां छोटे मियां', 'विरासत' आणि 'हंगामा 2' यासारख्या सिनेमांमध्ये त्यांनी साहाय्यक कलाकाराची भूमिका साकारली आणि प्रेक्षकांचे मनोरंजन केले.
(नक्की वाचा: धनश्री-युजवेंद्रचा घटस्फोट 'या' व्यक्तीमुळे होतोय? तो फोटो व्हायरल झाल्याने झाला होता वाद)
याव्यतिरिक्त त्यांनी 'जिंदगी अभी बाकी है मेरे घोस्ट' आणि 'सजन रे फिर झूठ मत बोलो' या मालिकांमध्येही काम केले आहे. 2024मध्ये प्रदर्शित झालेल्या राजकुमार राव आणि तृप्ति डिमरी यांच्या 'विक्की विद्या का वो वाला वीडियो' या सिनेमामध्येही झळकले होते.