Yuzvendra Chahal Dhanashree Verma Love Story: भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांनी एकमेकांना सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर अनफॉलो केले. तेव्हापासून दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगल्या आहेत. दोघे एकमेकांपासून विभक्त होत असल्याच्या कितीही चर्चा सुरू असल्या तरीही या जोडप्याने आतापर्यंत त्यांच्या नात्याबाबत कोणतेही भाष्य केलेले नाही. त्यामुळेच युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा त्यांचे नाते संपुष्टात आणत नाहीयेत, अशी आशा चाहत्यांना आशा आहे. . युजवेंद्र आणि चहल यांच्यामध्ये प्रेमाचे नाते कसे निर्माण झाले? जाणून घेऊया त्यांची अनोखी प्रेमकहाणी...
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
चहल आणि धनश्रीची पहिली ऑनलाइन भेट
युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांची प्रेमकहाणी एखाद्या परीकथेप्रमाणेच आहे. वर्ष 2020मध्ये कोव्हिड 19 लॉकडाऊनदरम्यान नागरिकांना घराबाहेर पडण्याची परवानगी नव्हती. त्यावेळेस काहीतरी नवीन शिकण्यासाठी चहलने सोशस मीडियाचा आधार घेतला. नवीन गोष्टीचा शोध घेत असताना त्याला धनश्रीचे काही डान्स व्हिडीओ पाहायला मिळाले. यानंतर चहलला देखील डान्स शिकण्याचे वेड लागले. डान्स क्लाससाठी त्याने धनश्रीशी संपर्क साधला आणि येथूनच त्यांच्या प्रेमकहाणीची सुरुवात झाली.
सुरुवातीला दोघांमध्ये मैत्रीचे नाते निर्माण झाले. पण जसजसे या दोघांमध्ये संवाद वाढला, तसतसे त्यांचे नाते मैत्रीपलिकडे गेले. स्वतः धनश्रीने डान्स रिअॅलिटी शो 'झलक दिखला जा 11' मध्ये ही माहिती सांगितली होती. धनश्रीने सांगितले की,"जेव्हा लॉकडाऊनदरम्यान एकही मॅच होत नव्हती. सर्व क्रिकेटर घरात बसून कंटाळले होते. यादरम्यान युजीने एके दिवशी ठरवले की त्याला डान्स शिकायचाय. यानंतर त्याने सोशल मीडियावर माझ्या डान्सचे काही व्हिडीओ पाहिले. व्हिडीओ पाहिल्यानंतर त्याला माझ्याकडे डान्स शिकायचे होते आणि मीही त्यासाठी होकार दिला".
(नक्की वाचा: Yuzvendra Chahal आणि Dhanashree Verma वेगळे होणार? 'या' निर्णयानंतर चर्चेला उधाण)
युजवेंद्र धनश्रीचा विद्यार्थी?
डान्स क्लासमुळे निर्माण झालेल्या नात्याचे रुपांतर प्रेमामध्ये झाले. धनश्रीच्या प्रत्येक गोष्टीमुळे प्रभावित झालो होतो, असे चहलनेही रणवीर अल्लाहबादियाच्या पॉडकास्ट शोमध्ये सांगितले होते. याच कारणामुळे त्याने आईवडिलांसोबत धनश्रीबाबत चर्चा केली आणि मनातील भावना त्यांच्यासमोर मांडल्या. त्याला धनश्रीसोबत लग्न करायचे होते.
8 ऑगस्ट 2020 रोजी क्युट कपलने केला साखरपुडा
चहल आणि धनश्रीने 8 ऑगस्ट 2020 रोजी साखरपुडा केल्याची घोषणा केली. चार महिन्यांनंतर म्हणजे 22 डिसेंबर 2020 रोजी या जोडप्याने लग्नगाठ बांधली. पारंपरिक भारतीय रितीनुसार चहल आणि धनश्रीचा ग्रँड विवाहसोहळा पार पडला.
हसतखेळत सरले पहिले वर्ष
चहल आणि धनश्रीचे लग्नानंतरचे पहिले वर्ष आनंदात सरले. सोशल मीडियावर दोघांचे फोटो आणि व्हिडीओ पाहायला मिळत होते. इतकंच नव्हे तर चहलसाठी धनश्री आयपीएलच्या मैदानावरही दिसायची. 2022पर्यंत त्यांचा सुखाचा संसार सुरू होता. दोघांनीही एकमेकांच्या करिअरमध्ये महत्त्वाचे योगदान दिले. एक वेळ अशी आली जेव्हा चहलचा वाईट काळ सुरू होता, तेव्हाही धनश्री त्याच्यासोबत खंबीरपणे उभी राहिली.
(नक्की वाचा: Yuzvendra Chahal Emotional Post: घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान युजवेंद्र चहलची इमोशनल पोस्ट)
दरम्यान 2023पर्यंत चहल-धनश्रीच्या नात्यातही मिठाचा खडा पडल्याचे दिसू लागले. सार्वजनिक ठिकाणी त्यांचे एकत्र दिसणे कमी होत गेले आणि सोशल मीडियाद्वारे त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याच्या गोष्टी दिसू लागल्या. इथंवर सारे काही ठीक होते. पण 2024मध्ये त्यांचे वैवाहिक नाते बिघडल्याच्या चर्चा रंगू लागल्या, पण या सर्व चर्चा चहलने फेटाळून लावल्या होत्या.
अफवांवर विश्वास ठेवू नका, असे त्याने पटवून देण्याचे काम केले. पण वर्षाअखेरिस त्यांचे नाते अधिकच बिघडले. यानंतर हे जोडपे देखील लवकरच विभक्त होणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या. चहलने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरील धनश्रीचे सर्व फोटो डिलीट केल्याने शंका वाढली.
(नक्की वाचा: युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री नेमके काय करते, किती आहे श्रीमंत?)
युजवेंद्रच्या त्या पोस्टमुळे वाढली शंका
4 जानेवारी 2025ला चहलने इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या स्टोरीमुळे घटस्फोटाच्या चर्चा अधिकच वाढू लागल्या. "कठोर मेहनत लोकांच्या चारित्र्यावर प्रकाश टाकण्याचे काम करते. तुम्हाला तुमचा प्रवास माहिती असतो. तुमच्या वेदना तुम्हाला माहिती असतात. इथंवर पोहोचण्यासाठी तुम्ही काय केलंय हे तुम्हाला माहिती आहे. जगाला माहिती आहे. तुम्ही खंबीरपणे उभे राहा. आईवडिलांना अभिमान वाटावा म्हणून तुम्ही घाम गाळून काम केलंय. अभिमानी मुलाप्रमाणे कायम खंबीरपणे उभे राहा", अशा आशयाची पोस्ट त्याने शेअर केली होती. पण याद्वारे त्याला नेमके काय म्हणायचे आहे, हे स्पष्टपणे कळू शकलेले नाही.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world