Rashmika Mandanna Vijay Deverakonda Wedding: रश्मिका-विजयने चाहत्यांना गुड न्यूज दिली, लग्नाची केली घोषणा

Rashmika Mandanna Vijay Deverakonda Wedding: रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांनी आपल्या लग्नाची घोषणा केलीय, कधी होणार लग्न? वाचा सविस्तर बातमी...

जाहिरात
Read Time: 2 mins
"Rashmika Mandanna Vijay Deverakonda Wedding: रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांनी लग्नाची केली घोषणा"
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांनी सोशल मीडियावर अधिकृतपणे त्यांच्या लग्नाबाबत माहिती दिली आहे
  • "विरोश लग्न" असे नाव त्यांनी त्यांच्या लग्नसोहळ्याला दिलंय
  • 26 फेब्रुवारी रोजी लग्न होणार असल्याची माहिती
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

Rashmika Mandanna Vijay Deverakonda Wedding: रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांच्या लग्नाच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर सुरू आहेत. अखेर रश्मिका आणि विजय दोघांनीही अधिकृतरित्या लग्नाबाबतची माहिती सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना दिलीय. चाहत्यांनी या जोडीला विरोश (VIROSH) असे नाव दिलं होतं. याचाच उल्लेख त्यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये केलाय. 

सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली माहिती

रश्मिका आणि विजयने आपापल्या इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत लग्नाची माहिती दिली आहे. या पोस्टमध्ये लिहिले आहे की, "प्रियजनांनो, कोणतीही योजना आखण्यापूर्वी किंवा स्वतःसाठी काहीही निवडण्यापूर्वी, तुम्ही आधीपासूनच आमच्या सोबत होता. इतक्या प्रेमाने तुम्ही आम्हाला एक नाव दिले. तुम्ही आम्हाला 'विरोश' म्हणून संबोधले. म्हणूनच आज पूर्णपणे मनापासून आम्ही तुमच्या सन्मानार्थ आमच्या या मिलनाला एक नाव देत आहोत. 'विरोशचं लग्न' असे या सोहळ्याला नाव द्यायला आम्हाला आवडेल. इतक्या प्रेमाने आमची साथ दिल्याबद्दल धन्यवाद".

(नक्की वाचा: Apurva Nemlekar Wedding Photos: रात्रीस खेळ चाले फेम अपूर्वा नेमळेकरनं बांधली लग्नगाठ, कोण आहे तनुज गोवळकर?)

विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदानाचं लग्न कधी होणार आहे? | Rashmika Mandanna Vijay Deverakonda Wedding Date

विजय आणि रश्मिकाने आपल्या पोस्टमध्ये लग्नाची तारीख सांगितलेली नाही. पण मीडिया रिपोर्ट्सनुसार हे जोडपं 26 फेब्रुवारी 2026 रोजी राजस्थान येथील उदयपूर शहरामध्ये लग्न करणार आहेत. लग्नसोहळ्यासाठी कपलने एक शाही महालाची निवड केलीय, जेथे केवळ कुटुंबातील सदस्य आणि जवळचे मित्रपरिवार सहभागी होतील. 21 फेब्रुवारी 2026 रोजी दोघांनाही एअरपोर्टवर पाहिले गेले, ज्यावरून रश्मिका आणि विजय लग्नासाठी उदयपूरच्या दिशेनं प्रवास करत असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.