Vivek Oberoi On Aishwarya Rai And Salman Khan : मागील काही वर्षांमध्ये सलमान खान आणि ऐश्वर्या रायच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं होतं. 'हम दील दे चुके सनम'हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड गाजला. त्यानंतर सलमान-ऐश्वर्या लव्ह बर्ड्स झाल्याच्या चर्चा रंगल्या. पण एक अभिनेता असा होता, ज्याने या दोघांच्या लव्ह स्टोरीमध्ये एन्ट्री मारली अन् बघता बघात त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला, असा आरोप आहे. या अभिनेत्याचं नाव आहे विवेक ओबेरॉय. काही महिन्यांपूर्वी विवेक ओबेरॉय 'केसरी वीर'चित्रपटात झळकला होता. पण प्रेक्षकांनी या चित्रपटाला मोठी पसंती दर्शवली नाही. अशातच विवेक आता नितेश तिवारी यांचा चित्रपट 'रामायणम'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.दरम्यान, विवेक ओबेरॉयने त्यांच्या वैयक्तिक जीवनाबद्दल,ऐश्वर्यासोबत झालेला ब्रेकअप आणि सलमान खानसोबत झालेल्या वादावर मोठी प्रतिक्रिया दिलीय.
विवेक ओबेरॉय आणि सलमानमध्ये झाला होता मोठा वाद
2003 मध्ये विवेक ओबेरॉय आणि सलमान खान यांच्यात वाद झाल्याची चर्चा होती. एका पत्रकार परिषदेत विवेक ओबेरॉयने म्हटलं होतं की, सलमानने त्याला धमकी दिली होती. कारण ऐश्वर्यासोबत त्याचं नातं सुरु झालं होतं आणि याचाच राग मनात धरून सलमानने धमकी दिल्याचं विवेकने स्पष्ट केलं होतं.त्यानंतर विवेक ओबेरॉयला फिल्म इंडस्ट्रीत खूप स्ट्रगल करावं लागलं होतं. परंतु, विवेक ओबेरॉयने नुकतंच एका मुलाखतीत या सर्व गोष्टींचा खुलासा केला आहे. विवेकने म्हटलंय, ब्रेकअपनंतर त्याला खूप दु:ख सोसावं लागलं.
नक्की वाचा >> गरबा खेळली अन् मध्यरात्री घरी निघाली, रस्त्यात एकटीला पाहून Rapido ड्रायव्हरने जे केलं..तरुणीनं व्हिडीओच बनवला
जीवनात खूप भावनिक आणि सेंसिटिव्ह व्यक्ती राहिलो आहे. मी ब्रेकअपच्या भीतीत जगू शकत नव्हतो. ते खूप भयानक असतं. तुम्हाला एकटेपणा जाणवतो. मी प्रेमाने कुटुंबासोबत राहणारा व्यक्ती आहे. ब्रेकअपनंतर मी एकटा राहू लागलो. स्वत:ला प्रोटेक्ट करत होतो. कारण मला त्या दु:खाला पुन्हा सामोरं जायचं नव्हतं. एक माणूस म्हणून आपण या परिस्थितीत जगतो. पण मी परिस्थितीला समोरं गेलो आणि पुन्हा नवं आयुष्य सुरु केलं.
2003 मध्ये सलमान-विवेक यांच्यात नेमकं काय घडलं होतं?
सलमानसोबत झालेल्या वादविवादावर बोलाताना विवेक ओबेरॉय म्हणाला, जेव्हा आपल्या डोक्यावर संकट घोंगावतं, तेव्हा खूप वेगळं वाटतं. तुमची परिस्थिती बदलते तेव्हा ते वाद मोठे वाटू लागतात. जेव्हा मी माझ्या मुलांच्या अडचणी पाहतो, तेव्हा मी हसतो. कारण मला वाटतं, त्यांच्या समस्या, समस्याच नाहीएत. मला वाटतं, देव जेव्हा तुमच्या समस्या पाहतो, तेव्हा त्यांना वाटतं, मुला ही तर तुझी खूप छोटी समस्या आहे. तू स्वत:ला मजबूत कर. जे काही मी भोगलं आहे, ते सर्व मी विसरलो आहे. तुमचे आई-वडील जेव्हा स्ट्रेसमध्ये असतात, तेव्हा त्यांना अशा स्थितीत पाहणं खूप कठीण असतं. पण वेळेनुसार तुम्हाला बदलावं लागतं आणि चांगल्या गोष्टी मनात ठेवाव्या लागतात.