Smriti Irani Transformation : स्मृती इराणींप्रमाणे फिट व्हायचंय? ट्रान्सफॉर्मेशनसाठी या सोप्या टीप्स फॉलो करा!

प्रसिद्ध मालिका क्योंकि सास भी कधी बहू थीमधील तुलसीची भूमिका साकारणाऱ्या स्मृती इराणी गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांच्या ट्रान्सफॉर्मेशनसाठी चर्चेत आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Smriti Irani Transformation : प्रसिद्ध मालिका क्योंकि सास भी कधी बहू थीमधील तुलसीची भूमिका साकारणाऱ्या स्मृती इराणी गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांच्या ट्रान्सफॉर्मेशनसाठी चर्चेत आहे. अभिनयातून राजकारणात आणि राजकारणातून पुन्हा अभिनयात पदार्पण करणाऱ्या स्मृती इराणी सध्या महिलांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. स्मृती इराणींना हे ट्रान्सफॉर्मेशन करणं कसं जमलं याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. 

तुम्हीदेखील स्वत:ला फॅटवरुन फिट करू इच्छित असाल तर स्मृती इराणींच्या ट्रान्सफॉर्मेशनमधून प्रेरणा घेऊ शकता. सध्याच्या लाइफस्टाइलमध्ये स्वत:ला फिट ठेवणं मोठं आव्हानात्मक आहे. मात्र हे काम इतकंही कठीण नाही. तुम्ही स्मृती इराणी यांच्यासारखी संतुलित लाइफस्टाइलचं पालन करू शकता. 

फिटनेस कसा ठेवाल? 

स्मृती इराणी यांनी आपल्या लाइफस्टाइलमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले. कोणत्याही एक गोष्टीवर अवलंबून राहण्याऐवजी त्यांनी योग, वॉक आणि योग्य लाइफस्टाइलची जोड देत शरीर आणि स्वास्थ सुधारलं. यासाठी त्यांनी क्रॅश डाएट केलं नाही किंवा औषधांचं सेवन केलं नाही. 

Advertisement

नक्की वाचा - Rice : भात खाल्ल्याने काय होतं? वजन कमी करायला कोणता तांदूळ खावा? जेवणामुळे वजन लवकर घटतं?

ग्लूटेन आणि डेअरी फ्री डाएट केला फॉलो...

सर्वात आधी त्यांनी आहाराकडे लक्ष केंद्रीत केलं. स्मृती इराणी यांनी ग्लूटेन आणि डेअरी फ्री डाएटचा अवलंब केला. याचा अर्थ त्यांनी गहू किंवा त्यापासून तयार केलेले पदार्ख आणि दुधापासून तयार केलेल्या पदार्थ टाळले. ग्लूटेन आणि डेअरी पदार्थांमध्ये अनेकांना पचनासंबंधित त्रास होऊ शकतो, यासाठी त्यांनी आहारातून असे पदार्थ कमी केले. 

प्रोटीनयुक्त नाश्त्याचं सेवन...

स्मृती आपल्या नाश्त्यात मुबलक प्रमाणात प्रथिनं घेतात. प्रोटीनमुळे वजन नियंत्रित राहण्यास मदत मिळते. प्रोटीनयुक्त अन्न घेतल्यामुळे भूक लागत नाही आणि स्नायू मजबूत राहतात. अंड, डाळ, पनीरचे पर्याय, चिया किंवा हेल्दी प्रोटीन सोर्स त्यांच्य दैनंदिन भोजनाचा भाग आहे. यामुळे त्यांचं मेटॉबॉलिजम सुधारण्यास मदत झाली आणि वजन कमी झालं. मिंट हिंदीने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे. 

Advertisement

व्यायामही आवश्यक...

आहारासह त्यांनी व्यायामाकडेही लक्ष दिलं. योग त्यांच्या फिटनेसचा महत्त्वाचा भाग राहिला. योगामुळे शरीर लवचित बनतं, तणाव कमी होतो आणि मानसिक शांतता मिळते. याशिवाय त्या नियमित वॉक करीत होत्या. 

दररोज पायी चालल्याने कॅलरीज बर्न होतात आणि हृदय मजबूत होतं. त्यांनी आहारात वांग्यांचा समावेश वाढवला. वांग्यात भरपूर फायबर असतं, ज्यामुळे लवकर भूक लागत नाही. यामुळे वजन कमी करण्यास मदत मिळते आणि कॅलरी कमी होते. 

Advertisement

हळूहळू या बदलांमुळे परिणाम दिसू लागला. स्मृती इराणी आधीपेक्षा जास्त फिट, सक्रिय दिसू लागल्या. त्यांची कहाणी सांगते की, विचारपूर्वक योग्य अन्न आणि नियमित व्यायामाचा अवलंब केला तर कोणीही फिट राहू शकतं.