OTT Releases This Week: ऑगस्ट महिन्याचा पहिलाच आठवडा खास अन् सुटयांनी भरलेला असेल. या आठवड्यात रक्षाबंधन सारखे सण आहेत ज्यामुळे कुटुंब एकत्रित येतात. अशावेळी ओटीटीवर धमाकेदार चित्रपट तसेच वेबसिरीज पाहण्याचा आनंद लुटण्याची मजा काही औरच. सिनेमागृहांमध्ये न जाता ओटीटीवर धमाकेदार सिरीज, चित्रपट पाहण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी हा आठवडा मेजवाणीच ठरणार आहे. कारण या आठवड्यात अनेक धमाकेदार सिरीज आणि चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जाणून घ्या या चित्रपटांबाबत...
Tamannaah Bhatia : पिंपल्स घालवण्यासाठी तमन्नाचा किळसवाणा उपाय, ऐकून तुम्हीही म्हणाल ईssss!
'वेडनेस 2': ही वेबसिरीज 6 ऑगस्ट रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. हॉरर कॉमेडी मालिकेच्या पहिल्या सीझनला प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रियता मिळाली होती. दुसरा सीझन दोन भागात प्रदर्शित होत आहे. पहिला भाग ०६ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल, तर दुसरा भाग सप्टेंबरमध्ये प्रदर्शित होईल.
मिकी 17: हा एक सायन्स फिक्शन ब्लॅक कॉमेडी चित्रपट आहे. त्याचे दिग्दर्शन बोंग जून हो यांनी केले आहे. त्यांनी त्याचे लेखन आणि निर्मिती देखील केली आहे. हे एडवर्ड अॅश्टन यांच्या 2022 च्या कादंबरीवर आधारित आहे. 'मिकी १७' हा चित्रपट ७ ऑगस्ट रोजी हॉटस्टारवर प्रदर्शित होईल.
मायासभा: द राईज ऑफ टायटन्स: ही तेलुगू भाषेतील राजकीय वेब सिरीज आहे. देवा कट्टा आणि किरण जय कुमार यांनी याचे दिग्दर्शन केले आहे. 7 ऑगस्ट रोजी सोनी लिव्हवर 'मायासभा' प्रदर्शित होईल.
सालाकर: हा भारत-पाकिस्तान या थीमवर आधारित एक गुप्तचर चित्रपट आहे. मुकेश ऋषी, नवीन कस्तुरिया आणि मौनी रॉय यात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. फारुख कबीर यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. ८ ऑगस्ट रोजी हॉटस्टारवर 'सालाकर' प्रदर्शित होईल.
स्टोलन: हीस्ट ऑफ द सेंचुरी: 8 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणारा हा माहितीपट 2003 च्या अँटवर्प डायमंड चोरीची कहाणी सांगतो. अर्धा अब्ज डॉलर्सच्या चोरीचे रहस्य प्रेक्षकांना खिळवून ठेवेल.
नरसिंहाची बॉक्स ऑफिसवर डरकाळी! 'सैय्यारा'चा पालापाचोळा उडवत कमावला 250% नफा