
'महावतार नरसिम्हा' ने (Mahavatar Narsimha Movie) हा ॲनिमेटेड चित्रपट ब्लॉकबस्टर 'सैय्यारा' ला जबरदस्त टक्कर देईल असा विचार कोणी केला नव्हता. पण, 'महावतार नरसिम्हा' या चित्रपटाने (Mahavatar Narsimha Movie) सैय्यासकट नवीन रिलीज झालेल्या 'सन ऑफ सरदार 2' आणि 'धडक 2' सारख्या चित्रपटां जबरदस्त टक्कर दिली आहे. दुसऱ्या शुक्रवारीही या चित्रपटाची दमदार कमाई सुरूच राहिली असून तो 'सुपर-हिट' झाला आहे.
( नक्की वाचा: 'हा' चेहरा नेमका कोणाचा? ‘दशावतार' सिनेमाचं पोस्टर रिलीज, गूढ वाढलं )
आठव्या दिवशी 7.5 कोटींची कमाई
'महावतार नरसिम्हा' ने (Mahavatar Narsimha Movie) प्रदर्शित झाल्याच्या आठव्या दिवशीही तगडी कमाई केली. आठव्या दिवशी या चित्रपटाने 7.5 कोटी रुपयांची तगडी कमाई केली आहे. विशेष बाब ही आहे की हिंदी भाषिक राज्यांमध्येही या चित्रपटाने आतापर्यंत दणदणीत कामगिरी केली आहे. प्रदर्शित झाल्याच्या दुसऱ्या शुक्रवारी या चित्रपटाने संपूर्ण भारतामध्ये 5.30 कोटी रुपये कमावले आहेत. उर्वरित कमाई तेलुगू, तमिळ, कन्नड आणि मल्याळम भाषेतून आली आहे.
The divine roar has echoed across the nation 🦁#MahavatarNarsimha has roared past all records, grossing ₹60.5 CRORES+ in just 8 DAYS to become India's Highest-Grossing Animated Film of All Time 💥💥#Mahavatar @hombalefilms @AshwinKleem @kleemproduction @VKiragandur @ChaluveG… pic.twitter.com/kAJNJRlPsY
— Hombale Films (@hombalefilms) August 2, 2025
या चित्रपटाची आतापर्यंतची एकूण कमाई 52.62 कोटी रुपये झाली आहे. करासह एकूण कमाई 62.09 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. होम्बळे फिल्म्स निर्मित हा चित्रपट फक्त 'सैय्यारा'लाच नाही, तर हिंदी भाषिक राज्यांमध्ये चांगली कामगिरी करण्याची अपेक्षा असलेल्या 'सन ऑफ सरदार 2' आणि 'धडक 2' यांनाही तगडी स्पर्धा देत आहे. 2 ऑगस्टला म्हणजेच शनिवारी आणि 3 ऑगस्टला म्हणजेच रविवारी हा चित्रपट अधिक चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा आहे.
( नक्की वाचा: दिग्दर्शकाने लिहिले शाहरूख खानसाठी 'प्रेम'पत्र )
मूळ कन्नड भाषेत प्रदर्शित करण्यात आलेला हा चित्रपट हिंदीसह 4 भाषांमध्ये डब करण्यात आला आहे. भाषावार या चित्रपटाने आतापर्यंत किती कमाई केली आहे त्यावर एक नजर टाकूया.
- हिंदी: 38.12 कोटी रुपये
- तेलुगू: 12.67 कोटी रुपये
- कन्नड: 1.16 कोटी रुपये
- तमिळ: 51 लाख रुपये
- मल्याळम: 16 लाख रुपये
- एकूण: 52.62 कोटी रुपये
2025 मधील सर्वात फायदेशीर चित्रपट
'महावतार नरसिम्हा' चित्रपटाच्या निर्मितीसाठी 15 कोटींचा खर्च आला होता. प्रदर्शनानंतर केवळ 8 दिवसांत या चित्रपटाने 250.8% नफा कमावला आहे, यामुळे हा चित्रपट सुपर-हिट म्हणून घोषित करण्यात आला आहे. हा चित्रपट 2025 मधील सर्वात फायदेशीर भारतीय चित्रपटांपैकी एक बनला आहे . तमिळ चित्रपट 'टुरिस्ट फॅमिली' ने 284.6% नफा कमावला होता. या चित्रपटाचा रेकॉर्ड 'महावतार नरसिम्हा' तोडेल अशी आशा अनेकांना वाटते आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world