Saiyaara success: अहान पांडेचं चंकी पांडे सोबतचं नातं काय? सैयाराच्या यशानंतर अहानची 'ती'कमेंट व्हायरल

दरम्यान, अहान पांडेची एक कमेंट व्हायरल होत आहे.त्यामध्ये तो त्याचे काका चंकी पांडे यांच्याशी काय संबंध आहे हे सांगत आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

अहान पांडे हळूहळू बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय स्टारकिड्सपैकी एक बनत चालला आहे. त्याचा बॉलिवूड पदार्पणाचा चित्रपट 'सैयारा' ला प्रेक्षकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. अहान पांडेला पुढचा मोठा सुपरस्टार मानले जात आहे. अनेक जण म्हणत आहेत की तो त्याचे काका चंकी पांडे आणि चुलत बहीण अनन्या पांडे यांच्या पावलांवर पाऊल टाकत आहे. ते दोघेही हिंदी चित्रपटसृष्टीत लोकप्रिय कलाकार म्हणून ओळखले जातात. याच दरम्यान, अहान पांडेची एक कमेंट व्हायरल होत आहे.त्यामध्ये तो त्याचे काका चंकी पांडे यांच्याशी काय संबंध आहे हे सांगत आहे.  

अहान पांडे चंकी पांडेबद्दल काय म्हणाला?
2019 मध्ये, जेव्हा अहान पांडे १९ वर्षांचा होता, तेव्हा तो आपल्या चाहत्यांशी संवाद साधण्यासाठी इन्स्टाग्राम लाईव्हवर आला होता. लाईव्ह चॅटदरम्यान, जेव्हा कोणी अहान पांडेला त्याच्या काकाबद्दल विचारले, तेव्हा अहान पांडे चिडला. स्पॉटबॉयनुसार, अहान पांडे म्हणाला, "हे मजेदार आहे की माझे आडनाव पांडे आहे, पण माझा त्यांच्याशी म्हणजेच चंकी पांडे यांच्याशी काहीही संबंध नाही. माझे वडील आलोक शरद पांडे आहेत. पांडे या आडनावाशी माझा एवढाच संबंध आहे. मी माझ्या लोकप्रियतेच्या माध्यमातून बी-टाऊनमध्ये स्वतःची जागा निर्माण केली आहे." असं तो म्हणाला. 

नक्की वाचा - Saiyaara Movie: 'सैयारा'चं बॉक्स ऑफिसवर जोरदार कलेक्शन, 'हा' कारनामा करत सिनेमांच्या गाण्यांनीही रचला इतिहास!

अहान पांडे आणि चंकी पांडे यांचा संबंध काय आहे?
अहान पांडेच्या व्हायरल झालेल्या कमेंट्स चाहत्यांना आवडल्या नाहीत. कारण त्याचे वडील, ज्यांना चिक्की पांडे म्हणून ओळखले जाते, ते चंकी पांडेचे धाकटे भाऊ आहेत. त्यामुळे अहान पांडे चंकीचा पुतण्या आहे. 2019 मध्ये अहान पांडेने केलेला इन्कार कौटुंबिक वादामुळे होता की नाही, हे स्पष्ट नाही. कारण संपूर्ण पांडे कुटुंब अहान पांडेचा पहिसा चित्रपट 'सैयारा' पाहण्यासाठी एकत्र आलं होतं. त्यांनी अहानच्या कामाचे कौतूकही केलं होतं. 

नक्की वाचा - Saiyaara Cast Fees: पहिल्याच चित्रपटासाठी छप्परफाड पैसा! 'सैयारा'साठी अहान-अनितने किती फी घेतली?

सैयाराच्या प्रीमियरला चंकी पांडे उपस्थित
चंकी पांडे अहान पांडेच्या पहिल्या चित्रपट सैयाराच्या प्रीमियरला उपस्थित होते. चित्रपट संपल्यानंतर त्यांना त्यांची पत्नी भावना पांडे सोबत थिएटरमधून बाहेर पडताना पाहिले गेले. जेव्हा त्यांना चित्रपट कसा वाटला असे विचारले, तेव्हा चंकी पांडेने अभिमानाने म्हटले, "खूप चांगला, उत्कृष्ट. ब्लॉकबस्टर." त्यानंतर हा चित्रपट खरोखरच बॉक्स ऑफीसवर सुपरहीट ठरला आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर रातोरात अहान हा सुपरस्टार झाला आहे. त्याच्या अभिनयाचे ही कौतूक केले जात आहे. पदार्पणातच दमदार कामगिरी करणाऱ्या स्ट्रार किड्सच्या पंगतीत तो जावून बसला आहे.  

Advertisement