Ranveer Singh : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह सध्या एका गंभीर कारणामुळे चर्चेत आहे. नुकतेच त्याला व्हॉट्सअॅपवर खंडणीची धमकी मिळाली आहे. ज्यानंतर मुंबई पोलीस अलर्ट झाली आहे. सध्या रणवीर सिंह मुंबईत हजर नाही आणि त्याच्या घराबाहेर सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. अद्याप या धमकीबाबत अधिक माहिती समोर आलेली नाही. मात्र पोलीस या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेत तपास करीत आहे. रणवीरच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेऊन आहे.
१३०० कोटी धुरंधर
रणवीर सिंग हा सध्याच्या काळातील सर्वात मोठ्या आणि यशस्वी बॉलीवूड कलाकारांपैकी एक आहे. त्याचा शेवटचा रिलीज झालेल्या "धुरंधर" चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कामगिरी केली आहे. वृत्तानुसार, या चित्रपटाने जगभरात १३०० कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे. ज्यामुळे रणवीरची स्टार पॉवर पुन्हा एकदा सिद्ध झाली. या चित्रपटानंतर त्याची लोकप्रियता वाढली आहे.
रणवीर सिंहचं करियर...
रणवीर सिंहने आपल्या करियरची सुरुवात 'बँड बाजा बारात'पासून केली होती. यानंतर त्याने 'बाजीराव मस्तानी', 'पद्मावत', 'गली बॉय',' सिम्बा', '८३' आणि 'रॉकी और रानी की प्रेम कहाणी' सारख्या बड्या बॅनरच्या चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारली. त्याच्या अनोख्या शैली, उत्साह आणि दमदार अभिनयामुळे त्याने बॉलिवूडमध्ये एक खास ओळख निर्माण केली आहे.