Which Celebrities Attended Dharmedra Funeral : दिग्गज अभिनेते धर्मेंद्रने 89 व्या वर्षी अखेरचा निरोप घेतला. जुहू येथील राहत्या घरी आज सोमवारी त्यांची प्राणज्योत मालवली. धर्मेंद्र गेल्या काही महिन्यांपासून आजारी होते. 12 नोव्हेंबरला धर्मेंद्रला ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलं होतं. या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. पण आज सोमवारी धर्मेंद्रची प्रकृती अचानक बिघडली आणि त्यांचा मृत्यू झाला. धर्मेंद्रच्या जाण्याने संपूर्ण बॉलिवूडसह देशभरात शोककळा पसरली. त्यांच्या जाण्याने चाहत्यांसह देओल कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. धर्मेंद्रवर विले पार्ले येथील पवन हंस स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. धर्मेंद्रचा मोठा मुलगा अभिनेता सनी दिओलने त्यांना मुखाग्नी दिली.
धर्मेंद्रच्या अंत्यसंस्काराला कोणते सेलिब्रिटी उपस्थित होते?
धर्मेंद्रच्या अंत्यसंस्कारावेळी अमिताभ बच्चन,आमिर खान,शाहरुख खान, सलमान खान,अक्षय कुमार,संजय दत्त, सायरा बानो, जायेद खान,जॅकी श्रॉफ, गोविंदासह अनेक कलाकार उपस्थित होते. ही-मॅनच्या निधनानंतर देओल कुटुंबीयांचं सांत्वन करण्यासाठी अनेक सेलिब्रिटींच्या रांगा लागल्या होत्या. यावेळी फराहन अख्तर,शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा,सलमान खान, सलीम खान,इशिता दत्ता,काजोलस इतर कलाकार धर्मेंद्रच्या घरी पोहोचले होते.
नक्की वाचा >> Dharmendra Death : सर्वांना खळखळून हसवतो!आज मात्र पुरता तुटला..कपिल शर्मासाठी धर्मेंद्र कोण होते? 2 शब्दातच..
या दिग्गजांनी सोशल मीडियावर वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली
तसच जुही चावला,रजनीकांत,केंद्रीय मंत्री पियुष गोयल, प्रियांका चोप्रा,हेमंत सोरेन, भाजप खासदार अरुण गोविल, शत्रुघ्न सिन्हा, व्ही व्ही एस लक्ष्मण, राज बब्बर, सचिन तेंडुलकर, विराट कोहली,सोनाली बेंद्रे, सुरेश रैना, दिया मिर्झा,सुष्मिता सेन, चिरंजीवी,नवज्योत सिंग सिद्धू,अल्लू अर्जून,अमिषा पटेल,अनुपम खेर,शबाना आझमी, हरभजन सिंग,स्मृती इराणी,संजय दत्त, कपिल शर्मा,मनोज वाजपेयी,अक्षय कुमार, सिद्धार्थ मल्होत्रा, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी धर्मेंद्रला सोशल मीडियाच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.