जाहिरात

Dharmendra Death : सर्वांना खळखळून हसवतो!आज मात्र पुरता तुटला..कपिल शर्मासाठी धर्मेंद्र कोण होते? 2 शब्दातच..

धर्मेंद्र यांच्या निधनाचे वृत्त समोर येताच अख्ख्या बॉलिवूडसह देशभरात शोककळा पसरली आहे. कपिल शर्मानेही हृदयस्पर्शी पोस्ट शेअर केली आहे.

Dharmendra Death : सर्वांना खळखळून हसवतो!आज मात्र पुरता तुटला..कपिल शर्मासाठी धर्मेंद्र कोण होते? 2 शब्दातच..
Kapil Sharma On Dharmendra
मुंबई:

Kapil Sharma Post On Dharmendra Death : धर्मेंद्र यांच्या निधनाचे वृत्त समोर येताच अख्ख्या बॉलिवूडसह देशभरात शोककळा पसरली आहे. धर्मेंद्र यांना राजकीय, समाजिक, क्रिडा विश्वासह अनेक क्षेत्रातील दिग्गज भावपूर्ण श्रद्धांजली वाहत आहेत. कॉमेडीचा सुपरस्टार कपिल शर्मानेही इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करून धर्मेंद्रला श्रद्धांजली वाहिली आहे. कपिल शर्माने धरम पाजींसाठी शेअर केलेली पोस्ट तमाम चाहत्यांच्या डोळ्यात पाणी आणणारी होती.कपिलने धर्मेंद्र यांचा एक फोटो शेअर करत लिहिलेंय,“अलविदा धरम पाजी तुमचं जाणं खूपच वेदनादायी आहे. असं वाटतंय, जणू दुसऱ्यांदा वडिलांना गमावलं आहे. तुम्ही दिलेलं प्रेम आणि आशीर्वाद नेहमी माझ्या मनात आणि आठवणींमध्ये राहील.एका क्षणात कोणाच्या मनात स्थान कसं मिळवायचं,हे तुमच्यापेक्षा कुणालाच माहित नव्हतं.तुम्ही सदैव आमच्या मनात राहाल. तुम्ही सदैव ईश्वराच्या चरणी राहो. 

धर्मेंद्रच्या अंत्यसंस्काराला दिग्गज सेलिब्रिटींची उपस्थिती

धर्मेंद्रच्या अंत्यसंस्कारावेळी बॉलिवूडचे अनेक दिग्गज कलाकार उपस्थित होते. धर्मेंद्र यांच्या अंत्यसंस्काराला कुटुंबीय आणि नातेवाईकांसोबतच बड्या सेलिब्रिटींनी उपस्थिती लावली होती. अमिताभ बच्चन,आमिर खान,गौरी खान,सलमान खान,अभिषेक बच्चन,सलीम खान,अनिल कपूर यांसह सर्वजण देओल कुटुंबीयांचं सांत्वन करण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचले होते.करण जोहर,काजोल,पंतप्रधान नरेंद्र मोदी,रवी किशन,मनोज वाजपेयी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून त्यांना भावपूर्वण श्रद्धांजली अर्पण केली. 

नक्की वाचा >> मुस्लीम अभिनेत्याशी लफडं अन् ब्रेकअप..आता करतेय उद्योगपतीशी लग्न, 39 वर्षांची हिरोईन आहे तरी कोण?

गेल्या काही दिवसांपासून धर्मेंद्रची तब्येत खालावली होती

काही दिवसांपूर्वी धर्मेंद्र यांची तब्येत बिघडली होती. वाढत्या वयामुळे उद्धवलेल्या आरोग्याच्या समस्यांमुळे त्यांच्यावर  ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु होते. काही दिवस उपचार घेतल्यानंतर या रुग्णालयातून त्यांना डिस्चार्ज देण्यात आलं होतं.डॉक्टरांनी असं म्हटलं होतं की, त्यांच्यावर घरीच उपचार सुरु राहतील आणि प्रकृती सुधारणेवर लक्ष दिलं जाईल. मात्र आज २४ नोव्हेंबर रोजी त्यांच्या निधनाच्या बातमीने सर्वांना मोठा धक्का बसला.

नक्की वाचा >> आजी अन् वडिलांचं निधन,आईने केलं दुसरं लग्न..विद्यार्थ्यानं आश्रमशाळेतच आयुष्य संपवलं! कारण काय?

Listen to the latest songs, only on JioSaavn.com