जाहिरात

Hema Malini Net Worth : धर्मेंद्र की हेमा मालिनी, कोण आहे सर्वात जास्त श्रीमंत? पैशांचा आकडा वाचून थक्कच व्हाल

Hema Malini And Dharmendra Networth: दिग्गज अभिनेता धर्मेंद्रला मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयातून आज 12 नोव्हेंबरला डिस्चार्ज देण्यात आला आहे. अशातच धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची एकूण संपत्ती किती आहे? जाणून घ्या.

Hema Malini Net Worth : धर्मेंद्र की हेमा मालिनी, कोण आहे सर्वात जास्त श्रीमंत? पैशांचा आकडा वाचून थक्कच व्हाल
Dharmendra And Hema Malini Net Worth
मुंबई:

Hema Malini And Dharmendra Networth: दिग्गज अभिनेता धर्मेंद्रला मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयातून आज 12 नोव्हेंबरला डिस्चार्ज देण्यात आला आहे. मागली 11 दिवसांपासून धर्मेंद्र यांच्यावर या रुग्णालयात उपचार सुरु होते. धर्मेंद्र यांचं निधन झाल्याची खोटी माहिती सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आली होती. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. दरम्यान, धर्मेंद यांना डिस्चार्ज मिळाल्यानंतर आता घरीच त्यांच्यावर पुढील उपचार करण्यात येणार आहेत. प्रकाश कौर आणि हेमा मालिनी धर्मेंद्र यांच्या पत्नी आहेत. धर्मेंद्र रुग्णालयात दाखल झाल्यानंतर त्यांच्या दोन्ही पत्नी चिंताग्रस्त झाल्या होत्या. धर्मेंद्र आता त्यांची पहिली पत्नी प्रकाश कौरसोबत त्यांच्या फार्महाऊसवर राहतात. अशातच जाणून घेऊयात धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्यात कोण जास्त श्रीमंत आहे आणि कोणाकडे जास्त संपत्ती आहे..

हेमा मालिनी यांचं नेटवर्थ किती?

धर्मेंद्रचं फिल्मी करिअर सुपरहिट राहीलं आहे. धर्मेंद्रचे अनेक सिनेमा तुफान गाजले आहेत. धर्मेंद्र यांना ही-मॅन आणि हेमा मालिनी यांना ड्रीम गर्ल म्हणून ओळखलं जातं. दोघांचीही फॅन फोलोईंग तगडी आहे. दोन्ही स्टार्सने अभिनयासोबतच राजकारणातही महत्त्वाची भूमिका बजावली आहे. दोघांच्याही संपत्तीबाबत बोलायचं झालं तर, वर्ष 2024 च्या निवडणुकीत दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, हेमा मालिनीची एकूण संपत्ती 129 कोटी रुपये आहे. ड्रीम गर्लकडे मोठं कार कलेक्शन आहे. यामध्ये त्यांच्याकडे 7 लक्झरी कार आहेत. याशिवाय त्यांच्याकडे जवळपास 3 कोटी रुपयांची जमीनही आहे. त्यांच्या बँक खात्यात 13 लाख रुपये जमा आहेत. मुंबई आणि मथुरात त्यांच्या नावावर अनेक रेसिडेन्शियल आणि कमर्शियल प्रॉपर्टी आहेत.

नक्की वाचा >> Blue Saree Lady: गुलाबी साडीला टक्कर! निळ्या साडीत मार्केट जाम करणारी महिला आहे तरी कोण? रातोरात झाली फेमस

धर्मेंद्रची एकूण संपत्ती

हेमा मालिनी सिनेमा, क्लासिकल डान्स परफॉरमन्स आणि राजकारणाच्या माध्यमातून आर्थिक उलाढाल करत असते. खासदार म्हणूनही हेमा मालिनी खूप सक्रिय असते आणि तगडी कमाई करते. सुपरस्टार धर्मेंद्र यांच्या नेटवर्थबाबत बोलायचं झालं तर, त्यांचं नेटवर्थ 300 ते 450 कोटी रुपये आहे. धर्मेंद्र यांनी 300 हून अधिक सिनेमांत काम केलं आहे आणि अजूनही ते सिनेमात काम करत आहेत. धर्मेंद्र त्यांच्या उद्योग धंद्यातूनही पैसे कमावतात. लोणावळा येथे त्यांच्या नावावर 100 एकरचं फार्म हाऊस आहे. मुंबईत अलिशान बंगला आणि लग्झरी कारचं मोठं कलेक्शन आहे. याशिवाय रेस्टॉरंट बिझनेसमध्येही पार्टनरशिप आहे. तसच त्यांच्या नावावर अनेक रिअल इस्टेट उद्योगही आहेत. धर्मेंद्र तेरी बातों में उलझा जिया (2024) या सिनेमात झळकले होते. आता ते 2025 मध्ये फिल्म इक्कीसमध्ये दिसणार आहेत.

नक्की वाचा >> Cheapest Liquor: कितीही टल्ली झाले, तरीही खिशाला लागणार नाही झळ, भारतात 'या' ठिकाणी मिळते सर्वात स्वस्त दारू!

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com