जाहिरात

Samreen Kaur : मिस इंडिया फायनलिस्ट आणि कोट्यवधींचं नेटवर्थ, कोण आहे अर्शदीप सिंगची गर्लफ्रेंड समरीन कौर?

 टीम इंडियाचा स्टार गोलंदाज अर्शदीप सिंगची प्रेयसी समरीन कौरची तुफान चर्चा रंगली आहे.वेगवान गोलंदाजांचे चाहतेही आता दोघांच्या प्रत्येक घडामोडींवर नजर ठेऊन आहेत.

Samreen Kaur : मिस इंडिया फायनलिस्ट आणि कोट्यवधींचं नेटवर्थ, कोण आहे अर्शदीप सिंगची गर्लफ्रेंड समरीन कौर?
Who Is Samreen Kaur

Arshdeep Singh Girlfriend Profile :  टीम इंडियाचा स्टार गोलंदाज अर्शदीप सिंगची प्रेयसी समरीन कौरची तुफान चर्चा रंगली आहे.वेगवान गोलंदाजांचे चाहतेही आता दोघांच्या प्रत्येक घडामोडींवर नजर ठेऊन आहेत.समरीन फक्त एक मॉडेल आमि एक्ट्रेस नाही.जम्मू-काश्मीरच्या समरीनने पुण्यातील प्रतिष्ठित सिम्बायोसिस कॉलेजमधून B.Com (Honours) चं शिक्षण घेतलं आहे. आज एंटरटेंन्मेंट इंडस्ट्रीसोबत सोशल मीडियावरही मोठं नाव केलं आहे. 

समरीन कौरचा जन्म 7 सप्टेंबर 1999 रोजी जम्मू काश्मीरमध्ये झाला होता. वर्ष 2018 मध्ये तिने फेमिना मिस इंडिया मध्ये जम्मू काश्मीरचं प्रतिनिधित्व केलं आणि फायनलिस्ट राहिली.त्यानंतर तिने मॉडलिंगच्या जगात पाऊल ठेवलं आणि त्यानंतर फिल्म,वेब सीरिज आणि म्यूझिक व्हिडीओच्या माध्यमातून ती प्रकाशझोतात आली. 

नक्की वाचा >> "कार्यकर्त्यांना गावी पाठवून त्यांच्या बायकांसोबत मिटिंग करत नाही", आमदार बालाजी किणीकरांचं खळबळजनक विधान

अर्शदीपची गर्लफ्रेंड समरीनचं शिक्षण किती?

समरीनने सिम्बायोसिस कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स,पुणे येथून बी.कॉम (ऑनर्स) ची डिग्री प्राप्त केली आहे.शिक्षण घेतल्यानंतर तिने एक्टिंगमध्ये करिअरला सुरुवात केली.समरीनने कबीर खानचा चित्रपट '83', ZEE5 चं 'Nail Polish' आणि पंजाबी फिल्म 'Sardaar Ji 2' मध्ये काम केलं आहे. याशिवाय तिने बादशाह,गुरु रंधवा,जुबिन नौटियाल, जस मानक आणि मनिंदर बुट्टर सारख्या प्रसिद्ध गायकाच्या म्युझिक व्हिडीओमध्येही झळकली आहे.

नक्की वाचा >> Amravati News: राणा दाम्पत्याची चहुबाजूने कोंडी? राणांच्या वर्चस्वाला भाजपचा सुरूंग, अमरावतीत काय-काय घडतंय?

सोशल मीडियावर जबरदस्त फॅन फॉलोईंग

सोशल मीडियावरही समरीनची जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे.इन्स्टाग्रामवर तिचे 4.6 मिलियनहून जास्त फॉलोअर्स आहेत.जिथे ती फॅशन,ट्रॅव्हल,फिटनेस आणि लाईफस्टाईलशी जोडलेल्या पोस्ट शेअर करते.तर अर्शदीप सिंगच्या इन्स्टाग्रामवर 6 मिलियनहून जास्त फॉलोअर्स आहेत. 

दोघांच्या नात्याबाबत चर्चा कधी सुरु झाली?

दोघांच्या रिलेशनशिपची चर्चा IPL 2026 मध्ये रंगली होती. समरीनला अनेकदा पंजाब किंग्जच्या सामन्यात अर्शदीपसाठी चिअरअप करताना पाहिलं गेलं.त्यानंतर दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले.आता अर्शदीपने इन्स्टाग्रामवर "My Person" कॅप्शनसोबत फोटो शेअर केले आहेत.
 

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com