Vithabai Narayangaonkar : तमाशात नाचता नाचता मुलीला जन्म दिला; मोठ्या पडद्यावर लावणी सम्राज्ञी कोण साकारणार?

गेल्या काही दशकांपूर्वी तमाशातील परिस्थिती आतापेक्षा वेगळी होती. अशाच एक तमाशा कलावंताची यशोगाथा चित्रपटाच्या माध्यमातून लोकांसमोर येणार आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Vithabai Narayangaonkar Movie : लावणी हा श्वास मानत आजवर अनेक कलावंतांनी तमाशा ही लोककला एक उच्च ठिकाणापर्यंत नेऊन ठेवली. गेल्या काही दशकांपूर्वी तमाशातील परिस्थिती आतापेक्षा वेगळी होती. अशाच एक तमाशा कलावंताची यशोगाथा चित्रपटाच्या माध्यमातून लोकांसमोर येणार आहे. विशेष म्हणजे हिंदीमध्ये हा चित्रपट (Eetha movie) प्रदर्शित होणार असून बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री विठाबाई नारायणगावकर यांची भूमिका साकारणार आहे. 

विठाबाईंचा भारत सरकारच्या संगीत नाटक अकादमीच्या पुरस्काराने गौरव

१९३५ साली जन्मलेल्या विठाबाई यांनी लावणी आपल्या जीवापेक्षाही जास्त जपली. आपण कलावंत आहोत, रसिकांच्या कला आस्वादात काही कमी पडू न देता ते प्रत्येक कार्यक्रम जीव तोडून करीत. आयुष्यात त्यांनी चढ-उतार पाहिले. मात्र तमाशाच्या बोर्डावर उभ्या राहिल्या की त्या स्वत:लाही विसरायच्या. अशा या विठाबाईला भारत सरकारचा संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे. १९९० मध्ये त्यांना कलेतील राष्ट्रपती पुरस्कार मिळाला. २००२ मध्ये त्यांचं निधन झालं. त्या हयात नसल्या तरी त्यांनी आपल्या कामाने तमाशाला एक प्रतिष्ठा मिळवून दिली. 

नक्की वाचा - Rashmika Mandanna : 'पुरुषांना मासिक पाळी...'; रश्मिकाच्या वक्तव्यावरुन वाद, अभिनेत्रीच्या स्पष्टीकरणानंतरही प्रकरण थांबेना

९ महिन्याच्या गरोदर असताना नाचल्या...

विठाबाईंबद्दलची एक आठवण सांगितली जाते. विठावाई ९ महिन्याच्या गरोदर असतानाही लावणी नाचत होत्या. त्यावेळी त्यांना अचानक गर्भकळा सुरू झाल्या. त्या स्टेजच्या मागे गेल्या आणि त्यांनी मुलीला जन्म दिला. येथे त्यांनी स्वत:ची नाळ स्वत: ठेचली. आणि पुन्हा स्टेजवर नाचायला उभ्या राहिल्या. हे सर्व पाहून रसिकांच्या डोळ्यात पाणी उभं राहिलं. आमचे पैसे फिटले असं म्हटल्यानंतर विठाबाईंनी लावणी थांबवली. अशा या लावणी सम्राज्ञीची कहाणी लवकरच मोठ्या पडद्यावर पाहता येणार आहे. काही वृत्तांनुसार, विठाबाई या भारत-चीन युद्धादरम्यान भारतीय सैनिकांचं मनोरंजन करण्यासाठी सीमेवर जाऊन तमाशा सादर करीत होत्या. त्यामुळे राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांचा सत्कारही करण्यात आला होता. 

Advertisement

कोण साकारणार विठाबाईची भूमिका?

काही माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तांनुसार, श्रद्धा कपूर ही अभिनेत्री विठाबाई नारायणगावकरांची भूमिका साकारणार आहे. अद्याप याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मण उत्तेकर 'इथा' या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत. उत्तेकरांच्या 'छावा' या चित्रपटाने बॉलिवूडमध्ये मोठं यश मिळवलं होतं. यंदा उत्तेकर तमाशाची राणी विठाबाई यांचं आयुष्य पडद्यासमोर आणणार आहेत. 

Advertisement