बॉलिवूडच्या दिवाळी पार्टीमधून गोविंदा का गायब आहे? पत्नीनं दिलं उत्तर

गोविंदा यावर्षी एकाही दिवाळी पार्टीला उपस्थित राहिला नाही. गोविंदाच्या पत्नी सुनीता यांनी त्याचं कारण सांगितलं आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
अभिनेता गोविंदा दिवाळी पार्टीमधून का गायब आहे?
मुंबई:

बॉलिवूडमध्ये सध्या दिवाळी पार्ट्या सुरु आहेत. दिवाळीचा आनंद एकत्र साजरा करण्यासाठी वेगवेगळ्या कलाकारांच्या घरी खास पार्टीचं आयोजन केलं जात आहे. या प्रकारच्या पार्ट्या आयोजित होण्याचं हे पहिलंच वर्ष नाही. दरवर्षी ही प्रथा सुरु आहे. पण, यंदा या पार्टीत नेहमी दिसणारा अभिनेता गोविंदा गायब आहे. गोविंदा यावर्षी एकाही दिवाळी पार्टीला उपस्थित राहिला नाही. गोविंदाच्या पत्नी सुनीता यांनी त्याचं कारण सांगितलं आहे.

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

सुनिता यांची एक व्हिडिओ क्लिप व्हायरल झालीय. त्यामध्ये त्या आणि त्यांची मुलगी टिना आहूजा दिसत आहेत. त्यावेळी त्यांनी गोविंदाच्या अनुपस्थितीबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिलं. 'सर एकदम ठीक आहेत. डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे. त्यामुळे ते यंदा दिवाळी पार्टीत आलेले नाहीत. मी मुलांसोबत आली आहे,' असं सुनिता यांनी स्पष्ट केलं. 

अभिनेता आणि सत्तारुढ शिवसेना पक्षाचा सदस्य असलेला गोविंदा 1 ऑक्टोबर रोजी स्वत:चं चुकून झाडलेल्या गोळीनं जखमी झाला होता. गोविंदा त्याच्याकडील परवानाधारक पिस्टल साफ करत होता. त्यावेळी चुकून निघालेली गोळी त्याच्या पायाला लागली. गोविंदाच्या जुहूमधील घरामध्ये ही घटना घडली. त्यानंतर त्याला तातडीनं जुहूमधील क्रिटीकेयर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यानंतर 4 ऑक्टोबर रोजी त्याला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. 

( नक्की वाचा : 'सलमानला सांगा, आम्ही उचलून नेऊ...' EX गर्लफ्रेंडनं सांगितला अंडरवर्ल्डच्या धमकीचा किस्सा )

गोविदांनं हॉस्पिटलच्या बाहेरच व्हिलचेअरवर बसून मीडियाशी संवाद साधला होता. त्यावेळी त्यानं सर्वांनी त्याच्यासाठी केलेल्या प्रार्थनेसाठी आभार मानले. 'मी सर्व देशवासियाचा त्यांचं प्रेम, आशीर्वाद आणि पाठिंब्यासाठी आभारी आहे. मी प्रशासन, पोलीस आणि विशेषत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानतो. तुमचे सर्वांचे प्रेम आणि आशीर्वादामुळे मी सुरक्षित आहे. तुमच्या प्रेमासाठी खूप खूप आभार, धन्यवाद. जय माता दी,' अशी भावना गोविंदानं व्यक्त केली होती.

Advertisement
Topics mentioned in this article