अंडरवर्ल्ड डॉन लॉरेन्स बिश्नोई गँगकडून मिळत असलेल्या धमकीमुळे सध्या सलमान खानचं नाव चर्चेत आहे. सलमानला 1990 च्या दशकामध्येही अंडरवर्ल्डकडून धमकी मिळाली होती, असा खळबळजनक गौप्यस्फोट त्याची माजी गर्लफ्रेंड सोमी अलीनं केलाय. सलमान आणि सोमी तेव्हा रिलेशशिपमध्ये होते. सोमी अली सलमानसोबत त्याच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये तीन वर्ष राहिली आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सोमी अलीनं एका मुलाखतीमध्ये सलमान खानसोबतचं रिलेशनशिप, बॉलिवूडमधील प्रवास, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याबाबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
सलमान देखील घाबरला होता
सोमी अली पुढं म्हणाली की, 'मी सलमानला याबाबत सांगितलं तेव्हा तो देखील घाबरला होता. पण, त्यानंतर त्यानं परिस्थिती शांत केली. सलमाननं हे कसं जमवलं ते त्यानं मला कधी सांगितलं नाही. अंडरवर्ल्डमधून धमकी कोण देत होतं? हे शोधण्याचा प्रयत्न केला होतास का? असा प्रश्न सोमी अलीला या मुलाखतीमध्ये विचारण्यात आला. त्यावरही तिनं उत्तर दिलं आहे.
( नक्की वाचा : Janhvi Kapoor : श्रीदेवीची लेक होणार माजी मुख्यमंत्र्यांच्या घरची सून? नव्या फोटोनं चर्चेला उधाण )
सोमीनं सांगितलं की, 'मी सलमानला या विषयावर दोन-तीन वेळा विचारलं. त्यावर तुला या गोष्टी माहिती नसतील तेच बरं आहे, असं त्यानं उत्तर दिलं. मी अल्लड आहे, हे सलमानला माहिती होतं. त्यामुळेच त्यानं मला या गोष्टीपासून दूर ठेवलं, असं सोमी अलीनं सांगितलं.
कोण आहे सोमी अली?
- सोमी अली 90 च्या दशकात बॉलिवूडमध्ये सक्रीय होती.
- सोमी आणि सलमान जवळपास आठ वर्ष रिलेशनशिपमध्ये होते
- सलमान आणि ऐश्वर्या राय यांच्यातील कथित प्रेम प्रकरणामुळे त्यांचं ब्रेकअप झालं.
- सोमी सध्या 'नो मोर टियर्स' ही एनजीओ चालवते
- या एनजीओच्या माध्यमातून ती मानवी तस्करी आणि घरगुती हिंसाचारातील पीडितांना मदत करते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world