Mukta Barve : 46 व्या वर्षीही अविवाहित; लग्नाचा विषय मुक्ताने दोन शब्दातच संपवला, पुन्हा कुणी विचारणारच नाही!

Actress Mukta Barve : लग्न न केल्यामुळे येणाऱ्या एकटेपणाबद्दल तिला विचारलेल्या प्रश्नावर मुक्ता मोकळपणाने व्यक्त झाली.

जाहिरात
Read Time: 2 mins

Actress Mukta Barve on Marriage : व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार प्राप्त आणि दर्जेदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनाचा ठाम घेणारी मराठीतील लोकप्रिय अभिनेत्री तिच्या ठाम मतांसाठी ओळखली जाते. मुक्ती बर्वे आता ४६ वर्षांची आहे, मात्र अद्यापही ती अविवाहित आहे. लग्नाबाबत विचारलेल्या प्रश्नावर मुक्ता बर्वेने सडेतोड उत्तर दिलं आहे. 

46 वर्षांची झाली, लग्नाचं काय? 

मुक्ता लग्नाच्या मुद्द्याबाबत म्हणाली, अजून लग्न का झालं नाही याचं उत्तर मी देतच नाही. कोणी माझ्या खाजगी आयुष्याबद्दल का विचारावं? माझं वैयक्तिक आयुष्य मी माझ्या कामापेक्षा कायमच लांब  ठेवलं आहे. ते एकत्र करण्याची मला गरजही वाटत नाही. जोपर्यंत त्याचा माझ्या जगण्यावर परिणाम होत नाही तोवर तो माझा अत्यंत वैयक्तिक प्रश्न आहे आणि तो आदरपूर्वक लोकांनीही जपला पाहिजे. माझ्याबाबतीत लोक ते नेहमीच जपतात. पूर्वी ते गंमत म्हणून विचारलं जायचं कारण तेव्हा स्थळं यायची आणि ती अजूनही येतात. पण त्याची चर्चा किंवा तो विषय असू नये कारण वैयक्तिक आयुष्य हे नेहमीच खाजगी असतं आणि माझं क्षेत्र म्हणून जे काम आहे ते वेगळं आहे".

मला एकटं राहायला आवडतं....

'आरपार' या युट्यूब चॅनलच्या 'वुमन की बात' मध्ये दिलेल्या मुलाखतीत मुक्ता बर्वे हिने अनेक गोष्टींवर दिलखुलास उत्तर दिली. लग्न न केल्यामुळे येणाऱ्या एकटेपणाबद्दल तिला विचारलेल्या प्रश्नावर मुक्ता मोकळपणाने व्यक्त झाली. लग्न कधी करणार यासारख्या किचकट वाटणारा प्रश्न मुक्ताने दोन शब्दात संपवला. ती म्हणाली, मला एकटं राहायला आवडतं. ती पुढे म्हणाली, मला माझी कंपनी आवडते... ते प्रत्येकाच्या स्वभावानुसार असतं. एकटेपणा तुम्हाला आवडत असेल तर काही अडचण वाटत नाही. मी माझ्या कामात पॅशनेट असते. मी अशा क्षेत्रात काम करते जिथं खूप माणसं तुमच्यासोबत असतात. ते व्यक्त होत असतात. त्यांना मत व्यक्त करायचं असतं. अजूनपर्यंत तरी  मला एकटेपणाचा कंटाळा आलेला नाही. अनेकदा मी दिवसभर वेब सीरिज पाहते...चित्रपट पाहते.. तर कधी कधी काहीही न करणे हा देखील माझा छंद आहे.

नक्की वाचा - कचऱ्यात सापडलेल्या मुलीला सुपरस्टारने आणलं घरी; आता अशी दिसते जणू अप्सराच, हॉलिवूड अभिनेत्याला केलंय डे

२१ नोव्हेंबरला मुक्ता बर्वे हिचा असंभव नावाचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यामध्ये प्रिया बापटनेही महत्त्वाची भूमिका आहे. हा सस्पेन्स थ्रिलर असून चाहत्यांमध्ये या चित्रपटाबाबत उत्सुकता आहे. 

Advertisement