Dharmendra : BJP जॉइन केल्यानंतर धर्मेंद्र यांना मुस्लीम महिलेचा कॉल; अस्सं उत्तर दिलं की Video होतोय व्हायरल

धर्मेंद्र यांचं करिअर जितकं जबरदस्त होतं, तितकाच रंजक त्यांचा राजकीय प्रवास होता.

जाहिरात
Read Time: 2 mins

Dharmendra Video Viral : भारतीय चित्रपटाच्या जगातील हिमॅन नावाने प्रसिद्ध धर्मेंद्र केवळ एक अभिनेता नव्हते, तर त्यांनी कोट्यवधी चाहत्यांच्या हृदय स्थान निर्माण केलं होतं. त्यांना पाहून चाहत्यांना आपलेपणाची भावना निर्माण व्हायची. २४ नोव्हेंबरला ८९ व्या वर्षी त्यांच्या निधनानंतर त्यांचे चित्रपट, त्यांचा साधेपणा आणि अनेक किस्से आठवत आहेत. धर्मेंद्र यांचं करिअर जितकं जबरदस्त होतं, तितकाच रंजक त्यांचा राजकीय प्रवास होता. विविध चित्रपटांमध्ये त्यांनी ३०० हून अधिक भूमिका साकारल्या. मात्र प्रत्यक्षात त्यांना राजकीय नेत्याचा अनुभव घेता आला. राजकीय प्रवासादरम्यान त्यांना विविध प्रकारचे अनुभव आले. काही चांगले, काही वाईट...मात्र अशा काही आठवणी आहेत, ज्या आजही तुम्हाला भावुक करतात. 

जुनी मुलाखत व्हायरल...

सध्या त्यांच्या निधनाच्या १२ दिवसांनंतर एक जुनी मुलाखत व्हायरल होत आहे. धर्मेंद्र यांनी २००४ मध्ये भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी एक मुस्लीम महिलेने त्यांना फोन करून असा प्रश्न उपस्थित केला की त्यांना धक्का बसला. धर्मेंद्र यांनी त्या फोन कॉलचं उत्तर दिलं होतं. तोच व्हिडिओ पुन्हा चर्चेत आहे. जाणून घेऊया भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर धर्मेंद्र यांना मुस्लीम महिलेने कॉल करून काय विचारलं...

Advertisement

धर्मेंद्र यांचा राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय

२००४ मध्ये देशात शायनिंग इंडियाची घोषणा गाजत होती. यादरम्यान अभिनेता शत्रुघ्न सिन्हा यांनी धर्मेंद्र आणि भाजप नेता लालकृष्ण आडवाणी यांची भेट घडवून आणली. यावेळी धर्मेंद्र भाजपमध्ये प्रवेश करण्याच निश्चित झालं. भाजपने त्यांना लोकसभेसाठी राजस्थानमधील बिकानेरमधून तिकीट दिलं. त्यांची लोकप्रियता इतकी अफाट होती की, त्यांनी काँग्रेसचे उमेदवार रामेश्वर लाल डूडी यांचा ६० हजार मतांनी पराभव केला. 

नक्की वाचा - Dharmendra : धर्मेंद्रंची 450 कोटींची संपत्ती! हेमा मालिनीच्या लेकीला वडिलांची ही खास गोष्ट हवीये, तिने स्पष्टच सांगितलं

भाजपमध्ये प्रवेश करताच मुस्लीम महिलेचा कॉल

धर्मेंद्र यांनी २००६ च्या मुलाखतीत एक भावुक करणारा किस्सा सांगितला. ते म्हणाले, मला एका मुस्लीम बहिणीचा कॉल आला होता. त्यांनी अत्यंत प्रेमाने मला विचारलं, धर्मेंद्रजी तुम्ही भाजपमध्ये का जाताय? त्यावेळी मला असा विचार आला की कदाचित हा पक्ष केवळ हिंदूंचा आहे. ते पुढे महिलेला म्हणाले, मी तुमचा प्रतिनिधी म्हणून भाजपमध्ये जात आहे. मी माझ्या मुस्लीम बांधवांचा प्रतिनिधी म्हणूनही जात आहे, कारण मी स्वतःला भारतातील सर्वात धर्मनिरपेक्ष व्यक्ती मानतो. मी कोणत्याही धर्मात फूट पाडत नाही...मी मानवतेवर विश्वास ठेवतो. धर्मेंद्र यांचा हा व्हिडिओ आजही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहे.


   


 

Topics mentioned in this article