बॉलिवूडमध्ये 2024 हे वर्ष उत्तम ठरलं. यावर्षी अभिनेता राजकुमार राव चर्चेत राहिला. राजकुमार रावच्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घातली. राजकुमार रावसाठी देखील हे वर्ष खास ठरलं. यावर्षी राजकुमार रावने चार चित्रपट केले. चारही चित्रपट आणि त्यातील गाणी चर्चेत राहिले. एक सिनेमातर सुपरहिट ठरला.
श्रीकांत
मे महिन्यात प्रदर्शित झालेल्या श्रीकांत या चित्रपटात राजकुमार रावने महत्त्वाची भूमिका साकारली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला. 'बॉलिवूड हंगामा'च्या अहवालानुसार, श्रीकांतच्या चित्रपटाने 50.05 कोटी रुपयांची कमाई केली आहे. याच कारणामुळे हा चित्रपट राजकुमारच्या हिट चित्रपटांच्या यादीत सामील झाला होता.
विक्की विद्या का वो व्हिडिओ
राजकुमार रावचा 'विक्की विद्या का वो व्हिडिओ' चित्रपट देखील चर्चेत राहिला. या सिनेमात त्याच्यासोबत अभिनेत्री तृप्ती डिमरी दिसली. या विनोदी चित्रपटाची कथा प्रेक्षकांना खूप आवडली. कमाईच्या बाबतीत बोलायचं तर सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 39.56 कोटींची कमाई केली.
स्त्री-2
राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर स्टारर 'स्त्री 2' ला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली. चित्रपटातील पंकज त्रिपाठीचा अभिनयही प्रेक्षकांना आवडला. चित्रपटाच्या कमाईबद्दल बोलायचे झाले तर चित्रपटाने एकूण 627.02 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
मिस्टर अँड मिसेस माही
राजकुमार राव आणि जान्हवी कपूर स्टारर चित्रपट मिस्टर अँड मिसेस माही सिनेमाही चर्चेत राहिला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 36.28 कोटींची कमाई केली. या चित्रपटात जान्हवी आणि राजकुमारची जोडीही खूप प्रेक्षकांना आवडली.