OTT Release: अख्खा देश हादरवणाऱ्या 5 हत्या.. 9.7 रेटिंग, सत्य घटनांवरील 'ही' भयावह सिरीज पाहिली का?

वैवाहिक जीवनात वादळे का यायला लागली? महिला आपल्या पतींसोबत असं का वागतात? बॉयफ्रेंडसाठी नवऱ्याची हत्या का करतात? असे अनेक प्रश्न यामध्ये उपस्थित केले आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins

Honeymoon Se Hatya on OTT: ओटीटी प्लॅटफॉर्मवर नवनवीन चित्रपट, डॉक्युमेट्री, वेबसिरीज प्रदर्शित होत असतात. अनेक सत्य घटनांवरील आधारीत माहितीपट एवढे थरारक अन् भयावह असतात की प्रेक्षकही हादरुन जातात. अशाच एका सिरीजने सध्या प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे. आयएमडीबीवर ९.७ रेटिंग असलेल्या या सिरीजचे नाव आहे, हनिमून से हत्या. 9 जानेवारीला ZEE5 वर प्रदर्शित झालेली ही सिरीज देशाला हादरवणाऱ्या दोन भयावह घटनांवर आधारित आहे. 

देश हादरवणाऱ्या घटना

गेल्या वर्षभरात विवाहबाह्य संबंधातील वादातून निर्घृण हत्या झाल्याच्या घटना घडल्या. यापैकी मेघालय येथील सोनम राजा रघुवंशी केस आणि मेरठमधील सौरभ रजपूतच्या हत्येने अवघा देश हादरून गेला होता. याच सत्य घटनांवर आधारित हनिमून से हत्या नावाची एक डॉक्युमेंट्री सिरीज प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या माहितीपटामध्ये  मेघालय येथे घडलेली सोनम राजा रघुवंशी केस, ते मेरठमधील निळा ड्रम केस, द भिव इन्फ्ल्युएन्सर केस, मुंबई टाइल केस आणि दिल्ली येथे घडलेली इलेक्ट्रिक शॉक केस अशा देशाला हादरणावऱ्या, समाजमन्न सुन्न करणाऱ्या अन् विचार करायला भाग पाडणाऱ्या हत्याकांडाचा समावेश आहे.

Divya Shinde in Bigg Boss Marathi: बिग बॉस मराठीच्या स्टेजवरुन 'जय भीम'; जुन्नरची वाघीण दिव्या शिंदे कोण आहे?

हनिमून से हत्या.. सिरीजला प्रेक्षकांचा प्रतिसाद 

अजितेश शर्मा यांनी या वेबसिरीजचे दिग्दर्शन केले आहे. या सिरीजला  IMDb वर १० पैकी ९.७ रेटिंग मिळाले आहे. वैवाहिक जीवनात वादळे का यायला लागली? महिला आपल्या पतींसोबत असं का वागतात? बॉयफ्रेंडसाठी नवऱ्याची हत्या का करतात? अशा परिस्थितीत त्यांची नेमकी मानसिकता काय असते? अशा अनेक प्रश्नांची कारणे या सिरीजमधून शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. 

ही सिरीज पाहिल्यानंतर प्रेक्षकही भरभरुन प्रतिक्रिया देत आहेत. यावर एका नेटकऱ्याने लिहिले आहे की हनिमून से हत्या पाहिल्यानंतर मला जाणवले की आपल्या देशात पुरुषांच्या बाजूने कोणतेही कायदे नसल्यामुळे पुरुष  बळी पडत आहेत. मात्र महिलांच्या संरक्षणासाठी अनेक कायदे आहेत, त्यामुळे दोघांसाठी समान कायदे यायला हवेत. तर आणखी एका युजरने ही फक्त सिरीज नाही तर पुरुषांसाठी धोक्याचा इशारा आहे, असं म्हटले आहे. 

Advertisement

Oscar Award: गुड न्यूज! ऑस्करच्या शर्यतीत 'कांतारा 1' आणि 'महावतार नरसिम्हा'ची एन्ट्री!