Bigg Boss Marathi Season 6 Who is Divya Shinde? : बिग बॉस मराठी पुन्हा एकदा सहाव्या सीजनसह प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. यंदा बिग बॉसच्या घरात कोणकोणाला एन्ट्री मिळणार याबाबत उत्सुकता होती. दरम्यान बिग बॉसच्या स्टेजवर 'जयभीम' म्हणत एका तरुणीने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. तिचं नाव आहे दिव्या शिंदे. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर दिव्या शिंदे ही सोशल मीडियावर 'सरकार' या नावाने ओळखली जाते. बेधडक संवादशैली, प्रभावी भाषण कौशल्य यासाठी दिव्या ओळखली जाते. दिव्याने बिग बॉसच्या स्टेजवर येताच रितेश देशमुख आणि महाराष्ट्राला 'जयभीम' म्हटलं.
कोण आहे दिव्या शिंदे? l Who is Divya Shinde?
काही दिवसांपूर्वी पुण्यातील सिंहगड लॉ कॉलेजविरोधातील आंदोलनाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये सिंहगड लॉ कॉलेजमध्ये डोनेशन घेऊन अॅडमिशन दिलं जातं आणि गरीब घरातील मुलांकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप करण्यात आला होता. यानिमित्ताने विद्यार्थ्यांच्या हक्काचा मुद्दा चर्चेत आला होता. आंबेडकरी चळवळ आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनात दिव्या हिरहिरीने भाग घेते. दिव्या शिंदे सोशल मीडियावर सक्रिय असते. ती विविध कार्यक्रमांमध्ये भाषणं करते आणि विद्यार्थ्यांमध्ये जनजागृतीचं काम करते. इन्स्टाग्रामवर तिचे फॉलोअर्स ९ लाख ३४ हजारांच्या घरात आहे.
बिग बॉस मराठी सहाव्या सीजनमध्ये कोणाची हजेरी?
1. दिपाली सय्यद
2. तन्वी कोलते
3. सचिन कुमावत
4. सोनाली राऊत
5. सागर कारंडे
6. आयुष संजीव
7. करण सोनावणे
8. प्रभु शेळके उर्फ डॉन
9. प्राजक्ता शुक्रे
10. रुचिता जामदार
11. अनुश्री माने
12. राकेश बापट
13. रोशन भजनकर
14. दिव्या शिंदे
15. राधा पाटील
16. ओमकार राऊत
17. विशाल कोटीयन
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world